For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकमेव कसोटीत पावसाचा विजय

06:41 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
एकमेव कसोटीत पावसाचा विजय
Advertisement

वृत्तसंस्था / ग्रेटर नोयडा

Advertisement

न्यूझीलंड आणि अफगाण यांच्यातील पाच दिवसांच्या एकमेव कसोटी सामन्यात पावसाचा विजय झाला. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस तसेच वादळी वारे वाहत होते. या एकमेव कसोटीत संपूर्ण पाच दिवसांचा खेळ वाया गेला.

या कसोटीतील पहिल्या दोन दिवसांचा खेळ मैदानामधील ओलसरता ही प्रमुख समस्या राहिली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकही चेंडू न टाकताना पूर्ण सामना रद्द करण्याची ही आठवी वेळ आहे. या कसोटीतील खेळाच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये सातत्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. मैदानामध्ये कव्हर्स घालण्यात आली होती. पण मैदान पूर्ण कोरडे नसल्याने पंचांनी किमान 2 वेळा ख्घ्sळपट्टी आणि मैदानाची पाहणी केली. या निरीक्षणानंतरच ही कसोटी रद्द केल्याची घोषणा पंचांनी केली. 2017 साली अफगाणला आयसीसीकडून कसोटी दर्जा मिळाल्यानंतर त्यांची ही दहावी कसोटी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.