भारतीय संघाची भिस्त श्रीराम बालाजीवर
वृत्तसंस्था / स्टॉकहोम
2024 च्या टेनिस हंगामातील सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत यजमान स्वीडन आणि भारत यांच्यात विश्वगट 1 मधील लढतीला येथे शनिवारी प्रारंभ होत आहे. भारतीय संघाची भिस्त प्रामुख्याने श्रीराम बालाजीच्या कामगिरीवर राहिल.
शनिवारी या लढतीतील पहिल्या दिवशी दोन एकेरी सामने खेळविले जाणार आहेत. सलामीचा एकेरी सामना स्वीडनचा एलाँग आणि भारताचा रामकुमार रामनाथन् यांच्यात होणार आहे. या लढतीसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी रोहित राजपालची निवड करण्यात आली आहे. बालाजीने अलिकडेच पाक विरुद्ध झालेल्या ग्रासकोर्टवरील लढतीत विजय मिळविला होता. स्टॉकहोममधील शनिवारपासून सुरू होणाऱ्या या लढतीत मानांकनात 332 व्या स्थानावरील रामकुमार रामनाथन्चा सलामीचा एकेरी सामना स्वीडनच्या लिवो बोर्गशी होत आहे. स्वीडन विरुद्धच्या या डेव्हिस लढतीत भारताचा सुमित नागल काही कौटुंबिक समस्येमुळे सहभागी होऊ शकणार नाही. भारताकडे एकेरीसाठी निकी पुनाचा हा प्रमुख पर्याय आहे. या लढतीत स्वीडनच्या टेनिसपटूंना भारताच्या तुलनेत अधिक प्रोत्साहन मिळेल. दोन्ही संघांना विजयाची समान संधी असल्याचे मत राजपालने व्यक्त केले आहे.