पाक-लंका सामन्यावर पावसाचे पाणी
वृत्तसंस्था / कोलंबो
आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी येथे 25 वा सामना सहयजमान लंका आणि पाक यांच्यात आयोजित केला होता. पण मुसळधार पावसामुळे हा सामना वाया गेल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली होती. पाकने 4.2 षटकात बिनबाद 18 धावा जमविल्या असताना मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. पंचांनी पाऊस थांबण्याची बराचवेळ वाट पाहिल्यानंतर त्यांनी हा सामना रद्द झाल्याची घोषणा केली. पाकच्या डावामध्ये मुनीबा अलीने 17 चेंडूत नाबाद 7 धावा तर ओमीमा सोहेलने 1 चौकारासह 9 चेंडूत नाबाद 9 धावा केल्या. आता शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यातील सामना इंदोरमध्ये दुपारी 3 वाजता तर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना विशाखापट्टनम येथे सकाळी 11 वाजता सुरू होईल. रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्राथमिक फेरीतील शेवटचा आाणि 28 वा सामना नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविला जाईल.