महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापुरात दिवसभर विश्रांती, रात्री धो धो

10:38 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ : अनेक गावांच्या पुलांवर पाणी आल्याने संपर्क तुटला

Advertisement

खानापूर : गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी रात्री तालुक्याला जोरदार झोडपले. त्यामुळे सर्वच नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत गुरुवारी सकाळी वाढ झाली. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांच्या संपर्क पुलावर पाणी आल्याने संपर्क तुटला होता. हलात्री नदीच्या पुलावर गेल्या पंधरा दिवसांपासून पाच फूट पाणी कायम असल्याने या भागातील नागरिकांना असोग्यावरून खानापूरशी संपर्क साधावा लागत आहे. यडोगा पुलावर पाणी आल्याने खानापूरशी संपर्क तुटलेला होता. दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने दुपारनंतर पाणीपातळी थोडी ओसरली होती.

Advertisement

जुलै महिन्यात 2252 मि. मी. नोंद

तालुक्यात जुलै महिन्यात सर्वाधिक एकूण 2252 मि. मी. पावसाची नोंद झाली असून गेल्या काही वर्षात जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद यंदा झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांची पातळी कायम टिकून आहे.

सर्वच नदी-नाले तुडुंब

तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सर्वच नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतली होती. बुधवारी सायंकाळनंतर पावसाने जोरदार सुरुवात केली होती. त्यानंतर पाऊस रात्रभर झाल्याने सकाळी मलप्रभा नदी पात्राची पाणीपातळी आठ दिवसात दुसऱ्यांदा वाढली होती. दुसऱ्यांदा नदीघाटाच्या बाहेर पाणी आले होते. त्यामुळे लोकांची धास्ती वाढली होती. सकाळी खानापूर शहरातील नागरिकांनी मलप्रभेचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी 10 पर्यंत पावसाचा जोर होता. गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र सायंकाळी 5 नंतर पुन्हा रात्री पाऊस सुरूच होता. गेल्या दीड महिन्यापासून मलप्रभा नदीसह तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांची पातळी कायमच वाढलेली दिसून येत आहे.

यडोगा पुलावर पाणी 

पश्चिम भागातील अनेक गावच्या संपर्क पुलावर गुरुवारी सकाळपासूनच पाणी होते. यडोगा पुलावरून पाणी वाहत होते. जळगा, चापगाव रस्त्यावरील नाल्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी होते. नंदगड परिसरात जोरदार पाऊस झाल्याने येथील शेतीच पाण्याखाली गेल्याचे स्वरुप दिसून येत होते. शेतीतील पाणी ओसरत नसल्याने भात पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. कणकुंबी, जांबोटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदीच्या पाणीपातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे.

खानापूर तालुक्यातील पावसाची नोंद 

खानापूर तालुक्यात 14 पर्जन्यमापक केंद्रातून सर्वाधिक नोंद गव्हाळी येथे 3502 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर सर्वात कमी पावसाची नोंद तालुक्यातील पर्जनमापन केंद्रात 540 मिलिमीटर झाली आहे. खानापूर 1164, नागरगाळी 1167, बिडी 650, गुंजी 1389, जांबोटी 1607, लोंढा रेल्वे स्टेशन 1879, लोंढा पीडब्ल्यूडी 1811, कक्केरी 540, असोगा 1444, कणकुंबी 2989, गव्हाळी 3502, चापोली 2946, आमगाव 3437, जामगाव 2307 मि. मी. पावसाची नोंद झालेली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article