राज्यात आठवडाअखेरपर्यंत पावसाची शक्यता
हवामानातील बदलांचा परिणाम
बेंगळूर : हवामानातील बदलांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्मयता असून तो आठवड्याच्या अखेरपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या किनारपट्टी, मलनाड आणि दक्षिणेकडील अंतर्गत भागात अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. शनिवारी बेंगळूरसह अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार झाल्यामुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान आहे. काहीवेळा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात 25 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहील. मान्सूनचे वारे परतले असून सक्रिय मान्सूनच्या वाऱ्यामुळे हवामानात अनेक बदल होत आहेत.
त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे, असे हवामानतज्ञांनी सांगितले. किनारपट्टी आणि मलनाड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता आहे. उत्तरेकडील अंतर्गत काही भागात मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. बेंगळूरच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान असून संध्याकाळी आणि रात्री अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्मयता आहे. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राच्या मते, 1 ऑक्टोबरपासून 18 ऑक्टोबरपर्यंत दक्षिणेकडील अंतर्गत भाग वगळता उर्वरित राज्यात नेहमीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. आणखी एका आठवड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्मयता असल्याने पावसाची तूट कमी होण्याची अपेक्षा आहे.