For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौंदत्ती, यल्लम्मा डोंगर भागाला पावसाने झोडपले

10:54 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सौंदत्ती  यल्लम्मा डोंगर भागाला पावसाने झोडपले
Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

Advertisement

सौंदत्ती व यल्लम्मा डोंगर परिसरात ढगफुटीसदृश्य अवकाळी पावसाने तडाखा दिला. गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास सुमारास दोन तासाहून अधिक काळ पाऊस झाल्याने सर्वांची तारांबळ उडाली. सौंदत्तीहून यल्लम्मा डोंगराकडे जाणाऱ्या रस्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला आहे. पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांचे तळे झाले. पावसाचा सौंदत्ती शहर व भागातील खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सौंदत्ती शहरातील नाले, गावागावातील ओढ्यांना पूर आला. रस्त्यांनाही ओढ्याचे स्वरूप आल्याने कांहीकाळ जनजीवन ठप्प झाले. पाण्याच्या वेगाने व कांही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे पिके वाहून गेली. तर झाडे भुईसपाट झाल्याने परिणामी शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अतिवृष्टीने यल्लम्मा मंदिरात बऱ्याच वर्षानंतर पाणी शिरल्याने भाविक व नागरिकांची तारांबळ उडाली.

शहरातील घराघरात पाणी शिरले

Advertisement

मुसळधार पावसामुळे गटारीचे पाणी घराघरात शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पडलेल्या पावसामुळे पावसाचे पाणी गल्लीत साचून सरळ घराघरात शिरल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शहरातील दुकानांत गटारातील पाणी शिरल्याने दुकानातील हजारो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गही हताश बनले आहेत.

Advertisement
Tags :

.