For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाळपईसह केपेला पावसाने झोडपले

12:45 PM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाळपईसह केपेला पावसाने झोडपले
Advertisement

चोवीस तासात सहा इंच नोंद,राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा 40 इंच अतिरिक्त, पुढील दोन दिवस मुसळधार

Advertisement

पणजी : पावसाचे प्रमाण कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा 1 हजार मि. मी. म्हणजेच 40 इंच अतिरिक्त पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासांमध्ये वाळपई व केपे भागात पावसाने झोडपून काढले. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 6 इंच पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाचे प्रमाण थोडे कमी होतेय अशी स्थिती असताना बुधवारी गोव्यात सकाळच्या दरम्यान थोडी उसंत व थोडा सुटकेचा नि:श्वास सोडला, मात्र जनतेचा हा आनंद अल्पावधीतच गेला. जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दुपारी थोडी विश्रांती घेतली व पुन्हा मुसळधार पाऊस पडला. सायंकाळी 6 वा. दरम्यान जोरदार वादळीवाऱ्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. पाऊस थांबून थांबून पडतोय. परंतु नेहमीसारखा शांतपणे न पडता वादळीवाऱ्यासह तो कोसळतोय. त्यातून अनेक झाडांना धोका निर्माण झालेला आहे व या जोरदार वादळात अनेक झाडे जमीनदोस्त होत आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे 

Advertisement

  • केंद्र  नोंदणी इंचामध्ये
  • म्हापसा 1.50
  • पेडणे 1.50
  • फोंडा 1.00
  • पणजी 1.50
  • जुनेगोवे 1.50
  • वाळपई 6.00
  • सांखळी 3.50
  • काणकोण  1.00
  • दाबोळी 0.75
  • मडगाव 3.25
  • मुरगाव 1.25
  • केपे 6.00
  • सांगे  4.50

यंदाच्या मौसमात ज्या तीन केंद्रावर आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली ती केंद्रे पुढीलप्रमाणे : मौसमात जेवढा पाऊस पडतो त्यापेक्षा जास्त पाऊस आताच झालेला आहे. अद्याप पावसाचे दोन महिने व मान्सूनोत्तर पावसाचा एक महिना मिळून पावसाचे तीन महिने जायचे आहेत. सर्वाधिक पाऊस हा वाळपईत 130 इंच, सांगे 125 इंच, सांखळी 121 इंच एवढी विक्रमी नोंद झालेली आहे. दरम्यान, आज व उद्या मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देऊन हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Advertisement
Tags :

.