कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा भागात पाऊस

10:52 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/हिंडलगा 

Advertisement

हिंडलगा परिसरात सोमवारी, मंगळवारी व बुधवारी हलकासा पाऊस पडला. वातावरणात सकाळपासून अतिशय उष्णता होती. त्यामुळे निश्चितपणे पाऊस पडण्याची खात्री होती. विजांचा  गडगडाटासह जोरदार वारा वाहत होता. परंतु म्हणावा तसा पाऊस पडला नाही. शेतकरीवर्गाला भरपूर पाऊस पडण्याची आशा होती. परंतु पाऊस झाला नाही. संध्याकाळच्या सुमारास पुन्हा ढग दाटून आले. पावसाचा शिडकावा थोडासा झाल्याने नाराजी पसरली. विहिरींनी तळ गाठला आहे. भरपूर पाऊस पडल्याशिवाय पाणी होणार नाही. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. हिंडलगा, सुळगा, आंबेवाडी, मण्णूर भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article