महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारवार जिल्ह्यात पावसाचा मारा सुरूच

10:47 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गंगावळी, अघनाशीनी, गुंडबाळ नद्यांना पूर : कारवार, अंकोला, भटकळ, होन्नावर, कुमठ्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी

Advertisement

कारवार : जिल्ह्यात दमदार पावसाचा मारा सुरूच आहे. घाटमाथ्यावरील यल्लापूर, शिर्सी, fिसद्धापूर तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे किनारपट्टीवर गंगावळी, अघनाशीनी, गुंडबाळ नद्यांना आलेला पूर अद्याप टिकून आहे. त्यामुळे अंकोला, कुमठा, होन्नावर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनारपट्टी जलमय झाली असून अंकोला, कुमठा, होन्नावर तालुक्यातील शेकडो घरे जलमय झाली आहेत. कारवार तालुक्यात होणाऱ्या दमदार पावसामुळे येथून जवळचा बैतखोल प्रदेश जलमय झाला आहे. पावसामुळे वनप्रदेशातील सरपटणारे प्राणी मानवी वसतीकडे धाव घेत आहेत. याचाच परिणाम म्हणून आज शुक्रवारी येथील सोनारवाड्यावरील एका घरावर बारा फूट लांबीचा अजगर आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र संतोष यांनी घटनास्थळी धाव घेऊन अजगराला ताब्यात घेतले. होन्नावर-बेंगळूर राष्ट्रीय हमरस्त्यावर दरडी कोसळण्याचा प्रकार सुरूच आहे.

Advertisement

समुद्राला उधाण 

जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. आज अमावस्येचा दिवस असल्यामुळे समुद्राने रौद्ररूप धारण केले आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी उंचच उंच लाटा किनाऱ्यावर आपटत आहेत. त्यामुळे किनारपट्टीवर अनेक ठिकाणी समुद्रझीजच्या समस्येने डोकेवर काढले आहे.

काळी नदीवरील कद्रा धरणाचे उघडले दरवाजे

आज शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता काळी नदीवरील कद्रा जलाशयाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरवाजातून सहा हजार क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. याशिवाय कद्रा जलविद्युत प्रकल्पातील विद्युत  जनित्रातून 22 हजार क्युसेक इतके पाणी नदीपात्रातून सोडण्यात येत आहे. त्यामुळे कारवार तालुक्यात काळी नदीला पुराचा धोका निर्माण झाला असून नदी तिरावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

एनडीआरएफचे जवान दाखल

जिल्ह्यात विशेष करून किनारपट्टीवर गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला जिल्ह्यात पाचारण करण्यात आले आहे. इन्स्पेक्टर अरूणदय द्विवेदी यांच्या नेतृत्वाखालील 29 जवान असलेले एनडीआरएफ पथक (दहावे बटालियन) आज शुक्रवारी जिल्ह्यात दाखल झाले असून या पथकाने होन्नावर तालुक्यातील मणकी येथे मुक्काम ठोकला आहे. हे पथक जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार कार्यरत राहणार आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून कारवार, अंकोला, भटकळ, होन्नावर, कुमठा या तालुक्यातील अंगणवाडी, शाळा-महाविद्यालयांना शनिवारी दि. 6 रोजी कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली आहे. चोवीस तासात जिल्ह्यात एक घर मोठ्या प्रमाणात तर 3 घरे भागश: कोसळली आहेत. एकूण 149 नागरिकांचे गंजी केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे.

मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना 

दरम्यान कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांनी होन्नावर तालुक्यातील चिक्कनकोड ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील पूर पिडीतासाठी सुरू करण्यात आलेल्या गंजी केंद्राची पाहणी केली. त्यावेळी मंत्री वैद्य यांनी पूर पिडीतांना सर्व प्रकारच्या मूलभूत आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.

अतिमुसळधार पावसाचा इशारा 

भारतीय हवामान खात्याने शुक्रवार दि. 5 पासून रविवार दि. 7 रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कारवार जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article