कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेल्वेकडून सर्व रेल्वेस्थानकांवर कडक बंदोबस्त

11:36 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रवाशांसह साहित्याची तपासणी :  पोलीस तैनात

Advertisement

बेळगाव : काश्मीरच्या पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर भारतीय सैन्याने रोखठोक दिले. या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाची ठिकाणे, रेल्वेस्थानके यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने या पार्श्वभूमीवर हुबळी विभागातील बेळगावसह सर्वच रेल्वेस्थानकांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. संशयास्पद कृती आढळल्यास तात्काळ त्याची चौकशी करण्यात येत आहे. हुबळी जंक्शनसह धारवाड, बेळगाव, लोंढा, वास्को यासह इतर महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर रेल्वे पोलिसांचे पथक नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य  पोलीस व श्वानपथक यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करण्यासह ठिकठिकाणी मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात येत आहे. संदिग्ध व्यक्तींची तपासणी व चौकशी करण्यात येत आहे.

Advertisement

रेल्वे पोलिसांचे आवाहन

रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली आहे. नैर्त्रुत्य रेल्वेचे विभागीय सेक्युरिटी कमिशनर अलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेल्वेस्थानक अथवा रेल्वेमध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्याची तात्काळ माहिती रेल्वे पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article