लवकरच रेल्वेचे ‘सुपर अॅप’ होणार लाँच
रेल्वे तिकीट बुकिंगसह अन्य सुविधा मिळणार
नवी दिल्ली :
भारतीय रेल्वे प्रवाशांना सुरळीत आणि चांगला अनुभव देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक नवनवीन शोध आणि बदल करत आहे. या संदर्भात रेल्वेने एक नवीन मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले आहे. अॅपचे ‘सुपर अॅप’ नावाने येत्या काही दिवसांत लॉचिंग होणार आहे. या नवीन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी प्रवाशांना एकाच प्लॅटफॉर्मवरून अनेक रेल्वे सेवांचा लाभ घेता येणार आहे.
पुढील महिन्यात लॉन्च होणार
डिसेंबरअखेर एक सर्वसमावेशक मोबाइल अॅप्लिकेशन ‘सुपर अॅप’ लाँच करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. याद्वारे प्रवाशांना तिकीट बुकिंग, प्लॅटफॉर्म पास खरेदी आणि ट्रेनचे लाइव्ह स्टेटस यासारख्या सुविधांचा सहज लाभ घेता येणार आहे. सुपर अॅपची रचना सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमद्वारे केली गेली आहे आणि प्रवाशांना अखंड अनुभव देण्यासाठी आयआरसीटीसीच्या प्रणालींसोबत काम करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आयआरसीटीसी आणि सीआरआयएस एकत्र
वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, आयआरसीटीसी व सीआरआयएस ट्रेनचे तिकीट खरेदी करणारे प्रवासी यांच्यातील मध्यस्थाची भूमिका करतील. सुपर अॅप आणि आयआरसीटीसी यांचे एकीकरण प्रगतीपथावर आहे. सध्या, रेल्वे प्रवासी विविध सेवांसाठी विविध अॅप्लिकेशन्स आणि वेबसाइट्स वापरतात, ज्यात तिकीट व्यवहारांसाठी घ्Rण्ऊण् Raग्त् ण्दहहाम्t अन्न वितरणासाठी घ्Rण्ऊण् ई-कॅटरिंग फूड ट्रॅकवर, फीडबॅकसाठी Raग्त् श्adad, अनारक्षित तिकिटांसाठी ळऊए चा वापर करतात.