For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेची धाव आता विद्युत इंजिनवर

06:42 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेची धाव आता विद्युत इंजिनवर
Advertisement

महिनाअखेरपासून बेळगावातून अंमलबजावणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

भारतीय रेल्वेने कात टाकली असून, नव्या पर्वाला प्रारंभ केला आहे. यापुढील काळात बेळगावहून धावणाऱ्या सर्वच रेल्वे विद्युत इंजिनवर धावणार आहेत. यामुळे डिझेल इंजिनचा आवाज यापुढे कमी होणार असून, रेल्वेची गतीदेखील वाढणार आहे. नुकतेच नैर्त्रुत्य रेल्वेने एक वेळापत्रक जाहीर करून येत्या दिवसात कोणत्या एक्स्प्रेस विद्युत इंजिनवर धावतील, याची माहिती दिली आहे.

Advertisement

मागील चार वर्षांपासून मुंबई-बेंगळूर या रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वीच विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे आता पुण्याहून हुबळीपर्यंत थेट विद्युत इंजिनद्वारे एक्स्प्रेस धावणार आहेत. यामुळे प्रदूषण तर कमी होणारच आहे, त्याचबरोबर प्रवासाचा कालावधीही घटण्यास मदत होणार आहे.

हुबळी-दादर एक्स्प्रेस 21 सप्टेंबरपासून विद्युत इंजिनवर धावणार

हुबळी-दादर एक्स्प्रेस 21 सप्टेंबरपासून विद्युत इंजिनवर धावणार आहे. त्याचबरोबर मिरज-हुबळी, मिरज-कॅसलरॉक, मिरज-लोंढा, कोल्हापूर-तिरुपती, दादर-पुदुच्चेरी यासह इतर एक्स्प्रेस सप्टेंबर अखेरपासून विद्युत इंजिनवर धावणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात डिझेल इंजिन इतिहासजमा होणार आहे.

Advertisement
Tags :

.