महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेल्वेचा सी. राहुल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स

10:31 AM Jan 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्राचा शशांक वाकडे उपविजेता, बेळगावच्या प्रशांत व प्रताप यांची बाजी, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाला सर्वसाधारण विजेतेपद

Advertisement

बेळगाव : बेळगाव येथे इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे 16 व्या सिनीयर पुरुष शरीरसौष्ठव व महिला मॉडेल फिजिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत रेल्वेच्या सी. राहुलने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा किताब पटकाविला तर महाराष्ट्राच्या शशांक वाकडेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सर्बो सिंगने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत वंदना ठाकुर तर वूमन्स मॉडेल फिजिकमध्ये आसामच्या बार्नाली बासुमातरे, तर 155 सें.मी. वरील गटात उत्तरप्रदेशच्या संजुने विजेतेपद पटकाविले. 285 गुणांसह रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने सर्वसाधारण विजेतेपद, 270 गुणांसह महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद तर 70 गुणांसह झारखंडने पहिले उपविजेतेपद पटकाविले.

Advertisement

अंगडी कॉलेज मैदान, सावगांव रोड येथील अन्नोत्सवाच्या मंचावर घेण्यात आलेल्या अंतिम फेरीचे निकाल :

महिला मॉडेल फिजिक

मिस्टर इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स गटासाठी संतोष यादव, नितीन म्हात्रे, परीक्षीत हजारिका, राजू खान, के. हरीबाबु सी. राहुल, चित्रेश नटेशन, आर. कार्तिकेश्वर, सान्निध्य बिश्त व शशांक वाकडे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये शशांक वाकडे व सी. राहुल यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर रेल्वेच्या सी. राहुल याने मि. इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा किताब पटकाविला. तर महाराष्ट्राचा शशांक वाकडे हा उपविजेता ठरला.

बक्षीस वितरण

स्पर्धेचे बक्षीस वितरण युवा नेते राहुल जारकिहोळी, आयबीबीएफचे अध्यक्ष स्वामी रमेशकुमार,वर्ल्ड शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव चेतन पाठारे, सचिव हिरल सेठ, मि. वर्ल्ड प्रेमचंद्र डिग्रा, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, मधुकर तळलकर, टी. व्ही. पॉली, भास्करन्, तुलशी सुजल, अजित सिद्दन्नावर, सुनील आपटेकर, आदी मान्यवरांच्या हस्ते मि. इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स सी. राहुल याला आकर्षक 5 फुटी चषक, मानाचा किताब, रोख 3 लाख रुपये, प्रमाणपत्र, सुवर्णपदक व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. तर उपविजेत्या शशांक वाकडेला चषक, 1 लाख रुपये, प्रमाणपत्र व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट पोझर सर्बो सिंगला 50 हजार रुपये रोख, चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

गटविजेते ठरलेले मि. इंडियाचे मानकरी

16 व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 ते 100 किलोवरील वजनी गटातील शरीरसौष्ठवपटूंनी मि. इंडिया हा मानाचा किताब पटकाविला. त्यामध्ये संतोष यादव, नितीन म्हात्रे, परीक्षित हजारिका, राजू खान, के. हरीबाबु, सी. राहुल, चित्रेश नटेशन, आर. कार्तिकेश्वर, सान्निध्य बिश्त व शशांक वाकडे यांचा समावेश आहे. नीटनेटके आयोजन केल्याबद्दल आयबीबीएफने बेळगाव शरीरसौष्ठव संघटनेचे कौतुक केले. संघटनेचे अध्यक्ष स्वामी रमेश, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे सचिव चेतन पाठारे यांनी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे खास स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव केला. 23 वर्षानंतर पुन्हा बेळगावकरांनी तितक्याच जोमाने स्पर्धा भरवून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article