एसटीचे रेल्वे स्टेशन बस्थानक पुन्हा खुले! प्रवाशांच्या मागणीला यश
कोल्हापूर प्रतिनिधी
रेल्वे स्टेशन येथील बसस्थानक एसटी प्रशासनाने काही कारणात्सव बंद केले होते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. संबंधित प्रवाशांनी यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे तक्रार केली होती. प्रशासनाने याची दखल घेत पुन्हा रेल्वे स्टेशन बसस्थानक खुले केले आहे. यामुळे प्रवाशांच्या मागणीला यश आले आहे.
कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या समोरच एसटीचे रेल्वे स्टेशन बसस्थानक आहे. येथून पन्हाळा, कोडोली, गिरोली, विशाळगड, रत्नागिरी, चिपळून, विजयदुर्ग, कोतोली, कोलोली, खोतवाडी, पाटीलवाडी, वाघबीळ मार्गे घुंगरवाडी बस सेवा दिली जाते. मुंबई-पुण्याहून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना या बसस्थानकाचा लाभ मिळत होता. मागील महिन्यांत हे बसस्थानक एसटी प्रशासनाने बंद केले होते. येथून बस येत होत्या. परंतू बसस्थानक बंद केल्याने प्रवाशांना बसच्या प्रतिक्षेत ताटकळत उभे रहावे लागत होते. यासंदर्भात प्रवाशांनी एसटीकडे तक्रार केली. यामुळे प्रशासानाने नुकतेच रेल्वे स्टेशन बसस्थानक पुन्हा सुरू केले आहे.
बसस्थानक सांयकाळी 6 पर्यंत खुले
रेल्वे स्टेशन बसस्थानक येथून पूर्वी सकाळी 6 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 10 अशा दोन शिप्टमध्ये येथील कामकाज होत होते. आता मात्र, सकाळी 6 ते सायंकाळी 6 वेळेतच बसस्थानक सुरू राहणार आहे. पहाटेपासून येथे बस असून रात्री उशीरापर्यंतही बस असतात. सायंकाळी 6 नंतर बस्थानकाच्या बाहेरच बसची प्रतिक्षा करावी लागत आहे.