मतमोजणी केंद्रामुळे वाहतूक मार्गात बदल
शहरात करवीर आणि कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदार संघाची मतमोजणी
रमण मळ्यात करवीर आणि कोल्हापूर उत्तरची मतमोजणी
राजारामपूरीतील व्हि.टी. पाटील भवनमध्ये कोल्हापूर दक्षिणची मतमोजणी
कोल्हापूर
शहरातील रमणमळा येथील शासकीय धान्य गोडावून जवळील बहुउद्देशीय हॉलमध्ये करवीर आणि कोल्हापूर उत्तर व राजारामपूरीतील व्हि. टी. पाटील, भवनमध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. यासाठी मतमोजणी केंद्राच्या परीसरातील वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे आली आहे.
रमणमळा मतमोजणी केंद्र
रमणमळा येथील मतमोजणी केंद्रामुळे सीपीआर चौक ते कसबा बावडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व वाहनांना महावीर कॉलेज चौक येथून पुढे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक पाटलाचा वाडा, जिल्हा अधिकारी कार्यालय चौक मार्गे मार्गस्थ होती. पितळी गणपती चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना पितळी गणपती या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांनी धैर्यप्रसाद चौक, सर्कीट हाऊस मार्गे पुढे मार्गस्थ होईल. तर कसबा बावडयाकडून पोस्ट ऑफिस मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालय चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना 4 नं. फाटक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहनांनी लाईन बाजार चौक, सर्कीट हाऊस मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे. रमण मळयातून येवून ड्रिमवर्ल्डचे पाठीमागील रोडने धोबी कट्टा पर्यंत ये-जा करण्यास तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोडावूनकडे जाण्यास तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोडावूनकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात आला आहे.
रमणमळा पार्किंग सुविधा
या मतमोजणी केंद्रावर मतमोजणीसाठी आलेले अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांची वाहने पोलीस मुख्यालय गार्डन समोरील रिकामी जागा आणि पोलीस फुटबॉल ग्राऊंड या दोन ठिकाणी करण्यात आली आहे.
निवडणूक निकाल पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहन पार्किंग
कसबा बावडा येथील रेणुका मंदिर पाठीमागील बाजू 100 फुटी रोडवर (दुचाकी व चारचाकीसाठी), महानगरपालिकेच्या 4 नं. शाळेचे मैदान (दुचाकीसाठी), शिंदे नर्सरी समोरील रस्त्याचे पलीकडील आत जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला (चारचाकीसाठी), मेरी वेदर मैदान (दुचाकीसाठी), सेंट झेव्हीयर्स शाळेचे मैदान (दुचाकीसाठी), होमगार्ड कार्यालय मैदान (दुचाकीसाठी).
रमणमळा परिसरातील स्थानिक रहिवाश्यांना सुचना
यशवंत सोसायटी पोवार मळा या भागातील रहिवाशांनी येण्या-जाण्यासाठी १०० फुटी रोडचा वापर करावा. रमणमळा, जावडेकर सोसायटी, तसेच छत्रपती शाहू हायस्कूल परिसरातील लोकांनी येण्या-जाण्यासाठी पोलो ग्राऊंड, छत्रपती शाहू हायस्कूल, महावीर कॉलेज किंवा प्राणी संग्रहालय पाठीमागील फाटक ते महावीर कॉलेज या मार्गाचा वापर करावा.
व्ही.टी. पाटील मतमोजणी केंद्र
व्हि.टी. पाटील मतमोजणी केंद्रावर कोल्हापूर दक्षिण मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी केंद्राकडे येणाऱ्या टाकाळा सिग्नल चौक ते व्ही. टी. पाटील भवन चौक व जनता बाजार चौक ते टाकाळा पर्यंत रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना टाकाळा सिग्नल चौक व जनता बाजार चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच त्या मार्गाला जोडणारा सेनापती बापट हा मार्ग स्टुंडट लाँड्री ठिकाणी सर्व वाहनासाठी बंद करण्यात आला आहे. लॉ कॉलेज ते राजारामपूरी मुख्य रस्त्यावरील 2 री गल्ली (बस रुट) हा सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून, या रस्त्यावरील वाहतुक पर्यायी मार्गावऊन मार्गस्थ होणार आहे. सेनापती बापट मार्गावरील कमला कॉलेज ते गुरुकुल अॅकॅडमी राजारामपुरी 5 वी गल्ली पर्यंत रस्ता सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. राजारामपुरी मेन रोडवरुन जनता चौकाकडे येणाऱ्या वाहनांना 2 री गल्ली येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या रोडवरील वाहतुक शाहु मिल मार्गे पुढे मार्गस्थ वळविण्यात आली आहे. बागल चौक ते टाकाळा जाणाऱ्या सर्व वाहनांना बागल चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
वळविण्यात आलेले मार्ग
टाकाळा चौक ते जनता बझार चौक मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी महागांवकर मार्ग या मार्गाचा येण्या-जाण्यासाठी वापर करावा किंवा टाकाळा चौक ते राजारामपुरी 1 ते 14 गल्ली या रस्त्यांचा वापर करावा. सेनापती बापट मार्गावऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी सेनापती बापट मार्गावर असणाऱ्या छेद रस्त्यांचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा. जनता बाजार चौक ते टाकाळा चौक या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी शहाजी लॉ कॉलेज चौक, साईक्स एक्स्टेंशन, परीख पुल या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा. बागल चौक ते टाकाळा मार्गे जाणाऱ्या वाहनांनी वारणा हॉस्पीटल, परीख पुल मार्गे टाकाळा या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा. राजारामपूरी मेन रोड बस रुटवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांनी राजारामपुरी 2 री गल्लीमार्गे शाहू मिल पोलीस चौकी येथून डावीकडे वळण घेवून बागल चौक मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे.
पार्किंग सुविधा
या मतमोजणी केंद्रावर मतमोजणीसाठी आलेले अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांनी आपली वाहने रहद्दारीच्या रस्त्यावर कोठेही पार्क करु नयेत, त्यांनी वाहन पार्किंगसाठी ताराराणी विद्यापीठ पार्किंग जागेचा वापर करावा. त्याकरीता पार्किंगमध्ये जाण्यासाठी डॉ. शाळीग्राम आय हॉस्पिटल नजीकच्या फाटकाचा वापर करावा. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरीकांनी आपली वाहने रहद्दारीच्या रस्त्यावर कोठेही पार्क करुन नयेत, त्यांनी आपली वाहने शाळा नं. 9 राजारामपूरी, भारत हौसिंग सोसायटी तसेच शहाजी लॉ कॉलेज ग्राउंड या पार्कंग म्हणून वापर करावा, असे आवाहन शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपूरे केले आहे.