6 तासांत उभारली रेल्वेस्थानकाची इमारत
विश्वविक्रमाची झाली नोंद
अखेरची रेल्वे जेव्हा रात्री निघून गेली, तेव्हा स्थानकावर जुनी इमारत होती, तर केवळ 6 तासांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पहिली रेल्वे पोहोचली, तेव्हा स्थानकाची इमारत पूर्णपणे नवी दिसून आली. ही कमाल जपानमध्ये घडली आहे. येथे एका जुन्या लाकडाने निर्मित स्थानक इमारतीच्या जागी केवळ 6 तासांमध्ये जगातील पहिले 3-डी मुद्रीत रेल्वेस्थानक निर्माण करण्यात आले. नवे रेल्वे स्थानक बगीच्याच्या शेडसारखे दिसते, ओसाकाच्या दक्षिणमध्ये ग्रामीण भाग एरिडामध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे, यात 3-डी प्रिंटेड मोर्टार मोल्ड्सचा वापर करण्यात आला. त्यांना असेंबल करण्यासाठी ट्रक्सद्वारे आणले गेले होते. क्रेनच्या मदतीने असेंबलिंगचे काम रात्रभर चालले. अखेरची रेल्वे रवाना झाल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी पहिली रेल्वे येईपर्यंत स्थानकाची इमारत उभी राहिली.
100 चौरस फुटाच्या क्षेत्रात ही संरचना
तयार संरचना 2.6 मीटर उंच असून ती 100 चौरस फुटांच्या क्षेत्रात फैलावलेली आहे आणि काँक्रिटने निर्माण करण्यात आलेली आहे. पांढऱ्या रंगाच्या संरचनेला मेंडारिन ऑरेंज आणि स्कॅबर्डफिशने सजविण्यात आले असून एरिकाची काही वैशिष्ट्यो आहेत.
पूर्णपणे भूकंपरोधक स्ट्रक्चर
पश्चिम जपान रेल्वेसोबत काम करणारी जपानी हाउसिंग फर्म सेरेन्डिक्सने नव्या संरचनेत छत आणि भिंतींसह चार भाग असून हे प्रबलित काँक्रिट घरांसमान भूकंपरोधक असल्याचे सांगितले. इमारतीची निर्मिती पूर्ण झाली असली तरीही तिकीट मशीन आणि कार्ड रीडर यासारख्या गोष्टी अद्याप स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. जुलैमध्ये हे स्थानक जनतेसाठी खुले केले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
..तर 2 महिन्यांचा कालावधी
या स्ट्रक्चरचे अंतर्गत कार्य पूर्ण झाल्यावर आणि तिकीट मशीन बसविण्यात आल्यावर 75 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वापरात असलेल्या लाकडी संरचनेला पाडविण्यात येणार आहे. मार्चच्या अखेरीस याची निर्मिती झाली तेव्हा एका रेल्वे अधिकाऱ्याने सर्वसाधारणपणे अशाप्रकारच्या स्थानक इमारतीच्या निर्मितीत दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे उद्गार काढले आहेत.
सुटे भाग निर्मितीसाठी 7 दिवस
कुमामोटो प्रांतातील एका कारखान्यात सुटे भाग प्रिंट करण्यासाठी आणि त्यांना काँक्रिटने मजबूत करण्याच्या प्रक्रियेत 7 दिवस लागले आहेत. मग त्यांना 24 मार्च रोजी सुमारे 800 किलोमीटर अंतरावर नेण्यात आले. जेथे क्रेनच्या मदतीने त्यांना जोडण्यात आले.
3-डी प्रिंटेंड बिल्डिंग
वेस्ट जपान रेल्वे कंपनीने मागील महिन्यात तयार झालेले हे स्थानक एरिकदामध्ये जगातील अशाप्रकारचे पहिले स्थानक असल्याचे म्हटले आहे. एरिका एक स्थानिक मासेमारीचे बंदर असून ते स्वत:च्या आकर्षक पर्वतरांगेसाठी देखील ओळखले जाते. वृद्ध होत असलेल्या समाजामुळे घटते कार्यबळ आणि ग्रामीण मार्गांवर कमी होत असलेल्या प्रवासीसंख्येच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पारंपरिक मार्ग पूर्ण करण्यास दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला असता तसेच खर्चही दुप्पट आला असता.