‘वेटिंग’वरील रेल्वे प्रवाशांनो रहा सावधान !
कोल्हापूर :
रेल्वेचे आरक्षित केलेले तिकीट कन्फर्म करून देण्याच्या बाहण्याने प्रवाशांची फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. यामध्ये प्रवाशांचे पैसे जातातच, तिकीटही कन्फर्म होत नाही. या उलट तिकीट तपासणीसाठी आलेल्या टिसीकडून दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागते.. अशा फसवणूक करणाऱ्यांपासून रेल्वे प्रवाशांनी सावध राहण्याची गरज आहे.
लांब पल्याच्या प्रवासाठी रेल्वेतून प्रवास करणारे सीट आरक्षित करताता. यामध्ये काही वेळेस आरक्षित केलेली सीट वेटींगवर असते. कन्फर्म झाल्यानंतरच सीट उपलब्ध होते. आरक्षित तिकीट कन्फर्मसाठीही आता प्रवाशांची फसवणूक प्रकार होत आहेत. मोबाईलवर आरक्षित तिकीट बुकिंगचे बनावट संदेश तयार करून प्रवाशाची फसवणूक करणाऱ्यास पुणे स्टेशन येथे टिसीच्या विशेष पथकाने मंगळवारी साफळा रूचून पकडण्यात आले. झेलम एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी पकडण्यात आले. तिकिटात नमूद केलेली आपली जागा निश्चित झाल्याचे आश्वासन देऊन 2 हजार रोख रक्कमेची त्यांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले. एक सीटवर दोन प्रवाशांना दावा करण्यात आला. यावेळी दोन गटांमध्ये झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. 12 डिसेंबर रोजीही असाच काहीसा प्रकार घडला होता.
अनधिकृत व्यक्तीकडून तिकीट खरेदी करू नका
अनधिकृत व्यक्ती किंवा माध्यमांकडून तिकीट खरेदी करू नये. स्थानकांवर रेल्वे बुकिंग विंडोवरून तिकीट बुक करा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे.
‘ई’ तिकीटमध्येही गोलमाल
काही ठिकाणी ‘ई’ तिकीट केंद्र आहेत. या ठिकाणी आरक्षित सीटचे तिकीट प्रवासी घेतात. परंतू ते वेटींगवर असते. प्रवासामध्ये काहींचे तिकीट कन्फर्म होत नाही. त्यामुळे त्यांचे 60 रूपये कपात करून उर्वरीत रक्कम रिफंड दिली जाते. ही रक्कम वास्तविक संबंधित प्रवाशांस मिळणे अपेक्षित आहे. परंतू ही रक्कम मिळत नाही. दुसरीकडे तिकीट कन्फर्म नसल्याने टिसी कारवाई करतात.