For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेने दिली मालगाडीला धडक, 4 जणांचा मृत्यू

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेने दिली मालगाडीला धडक  4 जणांचा मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था /प्राग

Advertisement

युरोपीय देश चेक प्रजासत्ताकमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे तेथे एक रेल्वे मालगाडीला जाऊन धडकली आहे. दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. चेक प्रजासत्ताकचे गृहमंत्री विट रकुसन यांनी या दुर्घटनेविषयी माहिती दिली आहे. प्रागपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरील पर्डुबिस शहरात ही दुर्घटना घडली. प्रवासी रेल्वे खासगी कंपनी रेजीओजेट कंपनीकडून संचालित केली जात होती.  या दुर्घटनेप्रकरणी अधिकारी तपास करत असल्याचे परिवहन मंत्री मार्टिन कुप्का यांनी सांगितले आहे. रेल्वेमधून 300 पेक्षा अधिक जण प्रवास करत होते. प्रवाशांमध्ये विदेशी नागरिकांचे प्रमाण अधिक होते. रेजियोजेटकडून संचालित रेल्वे स्लोवाकियाच्या सीमेनजीक पश्चिम युक्रेनियन शहर चोपच्या दिशेने जात होती. तर मालगाडीतून कॅल्शियम कार्बाइडची वाहतूक करण्यात येत होती. पंतप्रधान पेट्र फियाला यांनी या दुर्घटनेला मोठे संकट ठरवत मृतांच्या नातलगांबद्दल संवेदना व्यक्त केल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.