महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

संदेशखालीत छापा, शस्त्रे-दारूगोळा जप्त

06:46 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुन्हा दाखल करताच सीबीआयची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

सीबीआयने शुक्रवारी पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे अनेक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात विदेशी पिस्तुलांसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली. यापूर्वी गुरुवारीच सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवत तपासाला गती दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूलचा निलंबित नेता शेख शाहजहान हा अटकेत आहे. या हल्ल्याप्रकरणी शेख शाहजहानला बंगाल पोलिसांनी 29 फेब्रुवारीला अटक केली होती.

5 जानेवारी रोजी संदेशखाली येथे ईडीचे पथक कथित रेशन घोटाळ्याप्रकरणी शेख शाहजहानच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला झाला होता. सीबीआयला तपासादरम्यान संदेशखालीमध्ये शस्त्रास्त्रांचा साठा लपवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी सकाळी छापेमारी सुरू केली. या काळात विदेशी पिस्तुलांसह शस्त्रे जप्त करण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article