For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिरंजीवी, वैजयंती माला पद्मविभूषणने सन्मानित

07:10 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिरंजीवी  वैजयंती माला पद्मविभूषणने सन्मानित
Advertisement

अनेक दिग्गजांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी चिरंजीवी आणि वैजयंती माला यांना चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित केले आहे. या पुरस्कारविजेत्यांची घोषणा 25 जानेवारी रोजी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश (दिवंगत) एम. फातिमा बीवी यांना पद्मभूषण पुरस्काराने (मरणोत्तर) गौरविण्यात आले आहे. प्रसारमाध्यम दिग्गज होर्मूसजी एन. कामा यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. मूर्तिकार ए. वेलु आनंद चारी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर समाजसेवेसाटी सत्यव्रत मुखर्जी (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Advertisement

राष्ट्रपतींनी अंदमान आणि निकोबार येथील शेतकरी के. चेल्लाम्मल यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. तर जोशना चिनप्पा यांना क्रीडाक्षेत्रातील आणि सत्यनारायण बेलेरी यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातील कामगिरीसाठी जॉर्डन लेप्चा यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. 68 वर्षीय अभिनेते चिरंजीवी यांनी 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2006 मध्ये चिरंजीवी यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर 87 वर्षीय वैजयंती माला या 50-60 च्या दशकातील अत्यंत प्रभावी अभिनेत्री होत्या. वैजयंती माला यांनी वयाच्या 13 व्या वर्षी तमिळ चित्रपटसृष्टीतून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. तसेच अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

Advertisement
Tags :

.