For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गावठी दारू अड्ड्यावर छापे

06:44 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
गावठी दारू अड्ड्यावर छापे
Advertisement

सोनट्टी येथे 11 लाख रुपयांचे रसायन नष्ट, दोनशेहून अधिक पोलिसांचा सहभाग

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

सोनट्टी (ता. बेळगाव) येथील गावठी दारू अड्ड्यावर शनिवारी सकाळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने छापे टाकले. या छाप्यात 11 लाख रुपये किमतीचे गुळाचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. यासंबंधी महिलेसह चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर एम. बी. यांच्यासह काकती, हिरेबागेवाडी, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील अधिकारी व दोनशेहून अधिक पोलिसांनी भाग घेतला. यासंबंधी सिदराई राजकट्टी, शेट्ट्याव्वा राजकट्टी, सिद्धाप्पा पणगुत्ती, बाळाप्पा मुचंडी या चौघा जणांविरुद्ध काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी 200 पोलिसांसह शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता सोनट्टी येथील गावठी दारू अड्ड्यावर अचानक छापे टाकले. प्रत्येकी 200 लिटरचे 25 बॅरल गुळाचे रसायन, 10 अॅल्युमिनियम भांड्यात ठेवलेले रसायन असे सुमारे 11 लाख रुपये किमतीचे 5,700 लिटर रसायन नष्ट करण्यात आले. या कारवाईत 40 लिटर गावठी दारूही जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी या परिसरातील अनेक घरांमध्ये तपासणी केली. काही घरात गावठी दारू साठवून ठेवण्यात आली होती. तर नाल्याशेजारीही रसायन व दारू साठवण्यात आली होती. पोलिसांनी छापे टाकताच गावठी दारू तयार करणाऱ्यांनी तेथून पलायन केले आहे. अनेक वर्षांनंतर या परिसरात पोलिसांची कारवाई झाली आहे.

25 हजाराचे बक्षीस

गेल्या अनेक वर्षांपासून गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई झाली नव्हती. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी शनिवारी सकाळी अचानक छापे टाकून सोनट्टी परिसरातील अड्ड्याच उद्धवस्त केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस पथकाला आयुक्तांनी 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

Advertisement
Tags :

.