Sangli :आर्या लॉजिंगमधील जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगलीत हॉटेलवर तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
सांगली : सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरील हॉटेल आर्या लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर सांगली शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी उशिरा छापा मारला. आठ जणांविरुद्ध कारवाई करून २ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयित फारूख इलाही पखाले (वय ४०), सद्दाम इस्माईल नदाफ (वय ३२), शमशुद्दीन युसूफ पखाली (वय ३७, तिघे रा. मुजावर प्लॉट, बस स्थानकाजवळ, सांगली), रुणाल रणजीत कांबळे (वय २४, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली), सुमित प्रकाश चव्हाण (वय ५१, रा. शिवाजी मंडई, सांगली), सूरज दस्तगीर मांजरे (वय ३८), आदित्य प्रकाश शिकलगार (वय २२, दोघे रा. भारतनगर, हरिपूर रस्ता, सांगली), रणजीत रघुनाथ चव्हाण (वय ४०, रा. राम मंदिराजवळ, सांगली) यांच्यावर यावेळी कारवाई करण्यात आली.
दिवाळी सणाच्या अनुषंगाने शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक महादेव पोवार व पथक रविवारी सायंकाळी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना हॉटेल आर्या लॉजिंग येथे काही जण तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने छापा मारून आठ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाइल व दुचाकी असा २ लाख ५२ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे प्रकटीकरणचे संदीप पाटील, सतीश लिंबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, विशाल कोळी, गणेश कोळेकर, दिग्विजय साळुंखे, योगेश हाक्के यांच्या पथकाने कारवाई केली.