कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

म्हैसूरमधील ड्रग्ज कारखान्यावर छापा

06:18 AM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त : महाराष्ट्र-म्हैसूर पोलिसांची संयुक्त कारवाई, सहा जणांना अटक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

म्हैसूर या सांस्कृतिक शहरात सिंथेटिक ड्रग्ज एमडीएमए उत्पादन कारखान्यावर छापा टाकण्यात आला असून कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि म्हैसूर पोलिसांनी शहराबाहेरच्या रिंग रोडवरील एमडीएमए उत्पादन कारखान्यावर संयुक्त कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. विशिष्ट माहितीवरून कारवाई करत महाराष्ट्र पोलिसांनी शहराबाहेरील रिंग रोडजवळील एका ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर छापा टाकून तपासणी केली. दरम्यान, पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचे एमडीएमए आणि त्याच्या उत्पादनासाठी साठवलेला कच्चा माल जप्त केला आहे. म्हैसूरमध्ये सापडलेले ड्रग्ज महाराष्ट्राशी कनेक्शन आहे. महाराष्ट्रात अटक केलेल्या एका ड्रग्ज तस्कराने ही माहिती दिली होती. म्हैसूरमधून ड्रग्ज पुरवले जात असल्याची कबुली सदर तस्कराने दिली होती. त्यानुसार महाराष्ट्र पोलिसांनी रविवारी म्हैसूर पोलिसांच्या सहकार्याने छापा टाकला. म्हैसूरमधून महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये एमडीएमएचा पुरवठा होत असल्याचे समजताच कर्नाटकात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात अटक केलेल्या एका ड्रग्ज तस्कराने त्याला म्हैसूरहून एमडीएमए पुरवले जात असल्याची माहिती दिली होती. त्याआधारे, स्थानिक पोलिसांच्या मदतीने म्हैसूरमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article