For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुलचे शतक, जुरेलचे अर्धशतक

02:30 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
राहुलचे शतक  जुरेलचे अर्धशतक
Advertisement

वृत्तसंस्था / नॉर्दम्पटन

Advertisement

शुक्रवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात इंडिया अ ने  शेवटची बातमी हाती आली त्यावेळी पहिल्या डावात 5 बाद 267 धावा जमविल्या. के. एल. राहुलने दमदार शतक (116) तर जुरेलने अर्धशतक (52) झळकविले.

या मालिकेतील हा शेवटचा सामना असून पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. इंग्लंड लायन्सने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून इंडियाला अ ला प्रथम फलंदाजी दिली. मात्र यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार ईश्वरन हे दोन फलंदाज केवळ 40 धावांत तंबूत परतले. जैस्वालने 2 चौकारासह 17 तर ईश्वरनने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. त्यानंतर के. एल. राहुल आणि करुण नायर या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 86 धावांची भागिदारी केली. करुण नायरने 4 चौकारांसह 40 धावा जमविल्या. नायर बाद झाल्यानंतर राहुलला जुरेलने चांगली साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 121 धावांची शतकी भागिदारी केली. जुरेलने 87 चेंडूत 7 चौकारांसह 52 धावा झळकविल्या. राहुलने 151 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह शतक पूर्ण केले. त्यानंतर तो हिलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 1 षटकार आणि 15 चौकारांसह 116 धावा जमविल्या. या सामन्यात उपाहारावेळी इंडिया अ ची स्थिती 21 षटकात 2 बाद 75 तर चहापानावेळी त्यांची स्थिती 52 षटकात 3 बाद 213 अशी होती. राहुल शेवटच्या सत्रात पाचव्या गड्याच्या रुपात बाद झाला. इंग्लंड लायन्सतर्फे वोक्सने 48 धावांत 3 तर हिलने 56 धावांत 2 गडी बाद केले.

Advertisement

संक्षिप्त धावफलक: इंडिया अ : प. डाव 67 षटकात 5 बाद 267 (राहुल 116, करुण नायर 40, जुरेल 52, जैस्वाल 17, ईश्वरन 11, वोक्स 3-48, हिल 2-56)

Advertisement
Tags :

.