For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rahul Patil-Sadolikar In NCP : राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित, Ajit Pawar यांची घेतली भेट

03:31 PM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
rahul patil sadolikar in ncp   राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित  ajit pawar यांची घेतली भेट
Advertisement

मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतली भेट

Advertisement

मुंबई : दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह कै. पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.

मुंबईमध्ये पाटील यांनी कै. पी. एन. पाटील गटाच्या प्रमुख नेतेमंडळी व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते. कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत १९ किंवा २५ तारखेला समारंभपूर्वक हा पक्षप्रवेश होणार आहे.

Advertisement

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह, केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बी. एच. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक सत्यजित पाटील उपस्थि होते. 

तसेच कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भारत पाटील-भुयेकर, करवीर तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, भोगावतीचे साखर कारखान्याचे संचालक संचालक ए. डी. चौगुले, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक सत्यजित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य चेतन पाटील, हंबीरराव वळके, गणेश आडनाईक आदी प्रमुख उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.