For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राहुल नार्वेकरांचा निर्णय लोकशाहीची पायमल्ली करणारा !

04:50 PM Jan 11, 2024 IST | अनुजा कुडतरकर
राहुल नार्वेकरांचा निर्णय लोकशाहीची पायमल्ली करणारा

देश हुकूमशाहीकडे चालला आहे का ? संजय गवस यांचा सवाल

Advertisement

दोडामार्ग - वार्ताहर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय लोकशाहीची पायमल्ली करणारा असून, देश हुकूमशाही कडे चालला आहे का ? असा सवाल शिवसेना उबाठा तालुका प्रमुख संजय गवस यांनी उपस्थित करून या निर्णयांचा तीव्र निषेध केला आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सूचनेचे कुठे पालन करतात, देशाचे मूळ संविधान बाजूला करण्याचा घाट घालत आहे. आणि भाजप पुरस्कृत नवीन संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न दिल्लीतून केला जात, महाराष्ट्राची अस्मिता असलेली शिवसेना फोडण्याचे कारस्थान करून, महाराष्ट्र राज्य कमकुवत करण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे. मुंबई गिळंकृत करण्यासाठी, बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसाला त्रास देण्याचा जो प्रकार सत्ताधारी पक्षांनी सुरू केला आहे. तसेच ज्यांचे शिवसेनेत फक्त सात ते आठ वर्षे झाली असे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मंत्री शिवसेनेच्या विचारांचा वारसा सांगतात. हे मंत्री स्वार्थासाठी पक्ष बदलणारी माणसे आहेत..हे महाराष्ट्रातील जनता उघडया डोळ्यांनी पाहत आहेत.. 2018 ची शिवसेना पक्षांच्या घटनेचा चुकीचा अर्थ लावून, चुकीचा निर्णय दिला. तरी महाराष्ट्रातील शिवसैनिक व जनता उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी ठाम पणे उभी राहणार आहे. हे येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत स्पष्ट दिसेल असेही मत संजय गवस यांनी व्यक्त केले.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.