कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल मेहरवाडे ‘मि.कर्नाटक बजरंगी’

10:30 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रोनक गवस उपविजेता : उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर

Advertisement

बेळगाव : हुबळी येथे धारवाड जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना पंचमुखी हनुमान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मि. कर्नाटक बजरंगी शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगेरीच्या राहुल मेहरवाडेने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. कर्नाटक बजरंगी हा किताब पटकाविला.  बेळगावच्या रोनक गवसला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. तर बेळगावचा उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर ठरला. हुबळी येथील बजरंगी मैदानावर आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यातील जवळपास 110 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

Advertisement

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

मि. कर्नाटक बजरंगी किताबसाठी सलमान खान, साजिद बशेर, रोनक गवस, अल्लीनदाफ, राहुल मेहरवाडे, चेतन ताशिलदार, अनिल बी. यांच्यात लढत झाली. त्यामध्ये राहुल मेहरवाडे व रोनक गवस यांच्यात तुलनात्मक लढत झाली. आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर दावणगेरीच्या राहुल मेहरवाडेने मि. कर्नाटक बजरंगी हा किताब पटकाविला. रोनक गवसला उपविजेतेपद तर बेळगावच्या उमेश गंगणेने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला.

विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे डॉ. सुनील रेवणकर, बसवराज दोडमनी, मल्लय्या हिरेमठ, विनोद पाटील, डॉ. अभिषेक पाटील, सीपीआय जयवंत गवळी व शरीफ मुल्ला आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून राजेश लोहार, अनिल अंबरोळे, शरीफ मुल्ला, रमेश शेट्टी, एस. एस. तावडे, मोहम्मद इद्रीस, रणजीत किल्लेकर, श्रीधर बारटक्के, जितेंद्र काकतीकर, नागेंद्र मडिवाळ, नारायण चौगुले यांनी काम पाहिले. तर स्टेज मार्शल जावेद नायकर, उमेश रणदिवे, भरत बाळेकुंद्री, राजू पाटील, श्रीराज, मोहम्मद यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article