शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल मेहरवाडे ‘मि.कर्नाटक बजरंगी’
रोनक गवस उपविजेता : उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर
बेळगाव : हुबळी येथे धारवाड जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना पंचमुखी हनुमान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मि. कर्नाटक बजरंगी शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगेरीच्या राहुल मेहरवाडेने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. कर्नाटक बजरंगी हा किताब पटकाविला. बेळगावच्या रोनक गवसला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. तर बेळगावचा उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर ठरला. हुबळी येथील बजरंगी मैदानावर आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यातील जवळपास 110 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
- 55 किलो गट 1) सलमान खान-शिमोगा 2) सुमंत कुंभार-धारवाड 3) गौसपाक-धारवाड 4) खाजा एम. एस.-धारवाड 5) पांडुरंग गुरव- बेळगाव.
- 60 किलो गट 1) साजिद बेशेर-हरिहर 2) जोतिबा पाटील-बेळगाव 3) प्रभू चौगुले-बेळगाव 4) ओमकार गवस-बेळगाव 5) तुषार गावडे-बेळगाव.
- 65 किलो गट 1) रोनक गवस-बेळगाव 2) नागेश सी.-बेळगाव 3) स्टीफन दास-धारवाड 4) चेतन वाली-धारवाड 5) तेजस जाधव-बेळगाव.
- 70 किलो गट 1) अली नदाफ-बागलकोट 2) बसाप्पा कोनकेरी-बेळगाव 3) मलिक रेहान काझी-धारवाड 4) युवराज राक्षे-बेळगाव 5) रोयाझ खान-धारवाड.
- 75 किलो गट 1) राहुल मेहरवाडे-दावणगेरी 2) गणेश बंगेरा-द. कन्नडा 3) आकाश डी.-दावणगेरी 4) संतोष कुंभार-धारवाड 5) किरण आर.-दावणगेरी.
- 80 किलो गट 1) चेतन ताशिलदार-बेळगाव 2) शिवाप्पा एन.-बागलकोट 3) मारुती एस.-हुबळी 4) मुस्ताक अल्गार-विजापूर 5) मनिष एस.-बेळगाव.
- 80 वरील किलो गट 1) अनिल बी.-गदग 2) अब्बासअल्ली संदलवाले -धारवाड 3) प्रवीण कणबरकर-बेळगाव 4) श्रीमेश खन्नूकर-बेळगाव 5) दिग्विजय पाटील-बेळगाव.
मि. कर्नाटक बजरंगी किताबसाठी सलमान खान, साजिद बशेर, रोनक गवस, अल्लीनदाफ, राहुल मेहरवाडे, चेतन ताशिलदार, अनिल बी. यांच्यात लढत झाली. त्यामध्ये राहुल मेहरवाडे व रोनक गवस यांच्यात तुलनात्मक लढत झाली. आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर दावणगेरीच्या राहुल मेहरवाडेने मि. कर्नाटक बजरंगी हा किताब पटकाविला. रोनक गवसला उपविजेतेपद तर बेळगावच्या उमेश गंगणेने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला.
विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे डॉ. सुनील रेवणकर, बसवराज दोडमनी, मल्लय्या हिरेमठ, विनोद पाटील, डॉ. अभिषेक पाटील, सीपीआय जयवंत गवळी व शरीफ मुल्ला आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून राजेश लोहार, अनिल अंबरोळे, शरीफ मुल्ला, रमेश शेट्टी, एस. एस. तावडे, मोहम्मद इद्रीस, रणजीत किल्लेकर, श्रीधर बारटक्के, जितेंद्र काकतीकर, नागेंद्र मडिवाळ, नारायण चौगुले यांनी काम पाहिले. तर स्टेज मार्शल जावेद नायकर, उमेश रणदिवे, भरत बाळेकुंद्री, राजू पाटील, श्रीराज, मोहम्मद यांनी काम पाहिले.