महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राहुल केआर शेट्टी, भारत, टेन टेन एफसी विजयी

09:52 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब चषक साखळी फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारत एफसी, टेन टेन एफसी, राहुल केआर शेट्टी, ग्रो स्पोर्ट्स क्लब व राहुल के शेट्टी संघांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून विजय मिळवून प्रत्येकी दोन गुण मिळविले. वडगाव येथील सीआर सेव्हन टर्फ फुटबॉल मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भारत एफसीने डिसायडर संघाचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात 18 व्या मिनिटाला भारत एफसीच्या अभिषेक चेरेकरच्या पासवर सौरभ धामणेकरने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 29 व्या मिनिटाला भारत एफसीच्या श्रीकांतच्या पासवर अभिषेक चेरेकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 32 व्या मिनिटाला डिसायडरच्या श्रेयसने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. 40 व्या मिनिटाला भारत एफसीच्या अभिषेकच्या पासवर सौरभ धामणेकरने तिसरा गोल करून 3-1 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात राहुल के शेट्टीने के आर शेट्टी संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला राहुल शेट्टी संघाच्या रोहित घाटेकरच्या पासवर शहादाब मुकानदारने पहिला गोल केला. 28 व्या मिनिटाला शहादाबच्या पासवर रोहित घाटेकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 39 व्या मिनिटाला नदीम मकानदारच्या पासवर शहादाब मकानदारने तिसरा गोल केला.

Advertisement

तिसऱ्या सामन्यात टेन टेन एफसीने ओल्ड फॅट संघाचा 3-0 असा पराभव केला. सामन्याच्या 4 थ्या मिनिटाला अनिकेत मानेच्या पासवर आकाश देसाईने पहिला गोल केला. 22 व्या मिनिटाला अखिल पाटीलच्या पासवर अनिकेत मानेने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिला सत्रात मिळवून दिली. 31 व्या मिनिटाला आकाश देसाईच्या पासवर अखिल पाटीलने तिसरा गोल करून 3-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात ग्रो स्पोर्टस संघाने साईराज वॉरियर्सचा 3-2 अशा लढतीत निसटता पराभव केला. या सामन्यात 13 व्या मिनिटाला साईराजच्या निखील नेसरीकरच्या पासवर अनस चांदने पहिला गोल केला. 19, 33 व 38 व्या मिनिटाला ग्रो स्पोर्टसच्या अबुजर बिस्तीने सलग 3 गोल करून हॅट्ट्रिक नोंदविली. 42 व्या मिनिटाला साईराजच्या चांदच्या पासवर निखील नेसरीकरने दुसरा गोल करून 2-3 अशी आघाडी कमी केली. पाचव्या सामन्यात राहुल के आर शेट्टी संघाने डिसायडर एफसीचा 4-3 असा पराभव केला. या सामन्यात 6 व्या मिनिटाला राहुल शेट्टी संघाच्या इदायत मकानदारच्या पासवर नदीम मकानदारने पहिला गोल केला. 12 व्या मिनिटाला डिसायडरच्या अक्षय पोटेच्या पासवर मयूर पालेकरने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 19 व्या मिनिटाला राहुल शेट्टी संघाच्या रोहित घाटेकरच्या पासवर नितीन मंडोळकरने दुसरा गोल केला. तर 23 व्या मिनिटाला नदीमच्या पासवर रोहित घाटेकरने तिसरा गोल करून 3-1 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 36 व्या मिनिटाला डिसायडरच्या मयूरच्या पासवर मुस्ताकने दुसरा गोल केला. तर 40 व्या मिनिटाला मुस्ताकच्या पासवर अक्षय पोटेने तिसरा गोल करून 3-3 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली. खेळ संपण्यास कांही वेळ बाकी असताना राहुल के आर शेट्टीच्या निखील मंडोळकरच्या पासवर इदायत मकानदारने निर्णायक गोल करून 4-3 अशी आघाडी मिळवून दिली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article