राहुल गांधींची आज बेंगळुरात सभा
बेंगळूर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी झाली आहे, असा आरोप करत राहुल गांधी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत अनेक कागदपत्रे उघड केली आहेत. याच दरम्यान, शुक्रवारी राहुल गांधी यांची बेंगळुरात ‘व्होट अधिकार रॅली’ नावाने जाहीर सभा होणार आहे. फ्रीडम पार्क येथे होणाऱ्या या सभेला 1 लाख जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसमधील अनेक नेते सहभागी होणार आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर 6 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सभेला पक्षातील सर्व नेते, मंत्री, आमदार, पक्षाच्या विविध मोर्चाचे पदाधिकारी, विधानसभा, लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार, ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांना सक्तीने उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.