राहुल गांधींचे हेलिकॉप्टर झारखंडमध्ये ‘वेटिंग’वर
तब्बल दीड तासानंतर टेक ऑफची परवानगी
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमध्ये 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. भाजप-काँग्रेससह सर्वच पक्षांचे बडे नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने प्रचारधुरा सांभाळत आहेत. या नेत्यांमध्ये शुक्रवारी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झारखंडमधील गो•ा येथे पोहोचले. याचदरम्यान राहुल गांधी झारखंडमधील गो•ा येथे सुमारे दीड तास अडकले. हेलिकॉप्टरच्या उ•ाणाला एटीसीकडून मंजुरी न मिळाल्यामुळे त्यांच्या पुढील प्रवासाला सुमारे दीड ते दोन तास विलंब झाला. काँग्रेस नेत्यांनी याप्रकरणी भाजप नेत्यांवर तोफ डागताना राहुल गांधींचे हेलिकॉप्टर जाणूनबुजून थांबवल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला एटीसीकडून मंजुरी न मिळाल्याने महागामा येथून उ•ाण घेण्यास थांबवण्यात आले. यामुळे ते बराच वेळ हेलिकॉप्टरमध्ये बसून टेक ऑफची वाट पाहताना निदर्शनास आले. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला दीड तासांपासून उ•ाण करण्यास परवानगी देण्यात आली नाही. ही भाजपची हुकूमशाही असून दुसरे काहीही नाही, असे झारखंडच्या मंत्री आणि महागामा येथील काँग्रेस उमेदवार दीपिका पांडे सिंह यांनी सांगितले.