For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2,000 कोटींचे अमली पदार्थ जप्त

06:58 AM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
2 000 कोटींचे अमली पदार्थ जप्त
Advertisement

आठ इराणी तस्कर जाळ्यात : ऑपरेशन ‘सागर मंथन’ अंतर्गत गुजरातच्या सागरी हद्दीत एनसीबीची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ गांधीनगर

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), भारतीय नौदल आणि गुजरात पोलिसांच्या एटीएस पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरात समुद्रकिनाऱ्यावर भारतीय सागरी हद्दीत सुमारे 700 किलो मेथ ड्रग्जचा साठा पकडण्यात आला. या कारवाईदरम्यान 8 परदेशी नागरिकांनाही अटक करण्यात आली असून ते इराणी असल्याचे सांगण्यात आले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे 2,000 कोटी ऊपये आहे.

Advertisement

गेल्या अनेक दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ‘सागर मंथन’च्या नावाने कारवाई सुरू आहे. विशेषत: भारतात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी ही कारवाई केली जात आहे. याआधीही नार्कोटिक्स टीमने ऑपरेशन सागर मंथनमध्ये अनेक किलो ड्रग्ज जप्त केले आहे. सागरी मार्गाने होणारी अमली पदार्थांची तस्करी रोखणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

एनसीबीला ठोस माहिती उपलब्ध

गोपनीय सूत्रांकडून भारतात अमली पदार्थांचा मोठा साठा एका जहाजातून येत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. अमली पदार्थांची वाहतूक करणारे जहाज अनोंदणीकृत असून त्यात एआयएस म्हणजेच ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टमही उपलब्ध नसल्याची ठोस माहिती मिळाली होती. या जहाजातून अमली पदार्थ भारतीय भूभागात आणण्यात येणार असतानाच जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी ‘सागर-मंथन-4’ नावाचे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. भारतीय नौदलाने आपल्या सागरी शोध मोहिमेद्वारे हे जहाज पकडले. हे ऑपरेशन 15 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात आले. आता या ड्रग्ज सिंडिकेटचे पुढचे दुवे शोधण्यासाठी परदेशातील नार्कोटिक्स एजन्सींचीही मदत घेतली जात आहे.

3,400 किलो अमली पदार्थ जप्त

या वर्षाच्या सुऊवातीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ऑपरेशन ‘सागर-मंथन’ सुरू केले होते. या अंतर्गत भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांच्या एटीएसच्या सहकार्याने अनेक सागरी शोधमोहीम राबवण्यात आल्या आहेत. या कारवाईत आतापर्यंत सुमारे 3,400 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून 11 इराणी आणि 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच मुंबईनजिकच्या समुद्रातही जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.