For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कास्पारोव्हकडून राहुल गांधींची खिल्ली

06:33 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
कास्पारोव्हकडून राहुल गांधींची खिल्ली
Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक अनपेक्षित व्यक्तींचा प्रवेश होत आहे. जागतिक बुद्धीबळपटू गॅरी कास्पारोव्ह यानेही राहुल गांधींच्या संदर्भात काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी केलेल्या विधानावरुन प्रत्यक्ष राहुल गांधींचीच खिल्ली उडविली आहे. राहुल गांधी हे बुद्धीबळपटू आहेत. ते परिस्थिती बघून हुशारीने चाली रचतात. अशा प्रकारे ते सर्वोच्च पदावरील व्यक्तीला आव्हान देतात, असे विधान जयराम रमेश यांनी गांधी यांच्या संदर्भात केले होते. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अमेठीची निवड न करता, रायबरेलीची केली. हा गांधी यांच्या धोरणाचा भाग आहे, असे स्पष्ट करताना रमेश यांनी गांधींच्या बुद्धीबळपटुत्वाचा संदर्भ दिला होता. यावर भारतीय जनता पक्षाने तर प्रतिक्रिया दिलीच आहे, पण ध्यानीमनी नसताना गॅरी कास्पारोव्हनेही दिली.

Advertisement

‘राहुल गांधी यांनी आधी रायबरेलीची निवडणूक जिंकून दाखवावी. नंतर कोणाच्याही सर्वोच्च पदाला आव्हान देण्याची भाषा करावी,’ असे कास्पारोव्ह याने आपल्या ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हाती आयतेच आणखी एक कोलित मिळाले आहे. कास्पारोव्हने नंतर आपली पोस्ट हा एक विनोद होता, असे म्हटले असले तरी त्यातही त्याने राहुल गांधींना आणखी एक चिमटा काढलाच आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून त्या पोस्टवरुन सोशल मिडियावर अनेकांनी गांधी यांच्या विरोधात ‘मीम्स’ टाकले आहेत. भारतातील निवडणुकीत कास्पारोव्हचा हा प्रथम प्रवेश सध्या अशा प्रकारे गाजत आहे. असंख्य लाईक्स कास्पारोव्हच्या पोस्टला मिळालेले आहेत.

बरे झाले, आनंद निवृत्त झाला !

Advertisement

राहुल गांधींच्या बुद्धीबळपटुत्वासंबंधी एका ‘एक्स’ युजरने केलेली टिप्पणी गाजत आहे. ‘बरे झाले. विश्वनाथन आनंद लवकर निवृत्त झाला. नाहीतर त्याच्यावर आमच्या काळातील सर्वात उत्तम बुद्धीबळपटूशी स्पर्धा करण्याची वेळ आली असती,’ असे त्याने म्हटले आहे. ही पोस्ट वाचूनच कास्पारोव्हने ‘आधी रायबरेली जिंका, मग बाकीच्या गोष्टी बोला, अशा अर्थाची पोस्ट केलेली आहे.

आणखी एक चिमटा काढलाच !

‘राहुल गांधी यांच्यासंदर्भात मी केलेली टिप्पणी हा विनोदाचा भाग होता. त्यामुळे भारतातील लोकसभा निवडणुकीत मोठे वादळ उठणार नाही, अशी मी अपेक्षा करतो. मात्र, माझी दृष्टी चौफेर असते. एका राजकारण्याने माझ्या सर्वात आवडत्या खेळात अशा प्रकारे ढवळाढवळ केलेली मला आवडत नाही. म्हणून मी ही पोस्ट सोशल मिडियावर टाकली आहे, अशी पुस्तीही कास्पारोव्हने जोडली.

Advertisement
Tags :

.