महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मानहानीप्रकरणी राहुल गांधींना जामीन! अमित शाह यांना उद्देशून केली होती टिप्पणी

06:33 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमित शाह यांच्यासंबंधी वादग्रस्त टिप्पणीचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ सुल्तानपूर

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंबंधी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मंगळवारी मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूर एमपी-एलएलए न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे.

2018 मध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका सभेत अमित शाह यांना उद्देशून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. केरळच्या वायनाडचे खासदार राहुल गांधी हे याप्रकरणाच्या सुनावणीसाठी भारत जोडो न्याय यात्रा रोखून उपस्थित राहिले होते. राहुल यांची यात्रा सध्या अमेठीत पोहोचली आहे.

भाजप नेते विजय मिश्रा यांनी राहुल यांच्या विरोधात 4 ऑगस्ट 2018 रोजी मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी 8 मे 2018 रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान बेंगळूर येथे आयोजित सभेत भाजपचे नेते अमित शाह यांना हत्येप्रकरणी दोषी संबोधिले होते.

राहुल गांधी यांनी अमित शाह यांना ‘खुनी’ म्हटले होते, तसेच अन्य आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. अशा पक्षाच्या तत्कालीन अध्यक्षाला खुनी संबोधिणे गैर आहे. राहुल गांधी यांच्या कृत्यामुळे आम्ही दुखावलो गेलो, असे भाजप नेते विजय मिश्रा यांनी मंगळवारी सुनावणीपूर्वी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article