राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून केला उमेदवारी अर्ज दाखल
03:33 PM Apr 03, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
मेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये रोड शो केला. यामध्ये प्रियांका गांधी यांच्यासोबतच काँग्रेसचे इतर नेतेही उपस्थित होते. स्थानिक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. वायनाड हा मतदारसंघ माझ्यासाठी नवा होता. पण आपण सगळ्यांनी मला साथ दिलीत. आपल्या घरातील सदस्य करून घेतलंत. या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीने मला प्रेम, स्नेह आणि सन्मान दिला. तुमच्यातलाच एक मला मानलं. त्यामुळे मी आभारी आहे. यंदा पुन्हा एकदा संसदेत तुमचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल. अशी आशा व्यक्त करतो, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. राहुल गांधी दुसऱ्यांदा वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढत आहेत. मागच्या वेळी राहुल गांधी यांनी वायनाड आणि अमेठीमधून निवडणूक लढली होती. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला. यंदा मात्र राहुल गांधी केवळ वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढत आहेत.
Advertisement
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्यासोबत प्रियांका गांधी देखील होत्या. देशात सार्वत्रित लोकसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांचे लोक आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची बहिण तथा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यादेखील उपस्थित होत्या.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article