For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधींनी कमावले 46 लाख रुपये !

06:47 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधींनी कमावले 46 लाख रुपये
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

शेअरबाजारात चालणाऱ्या व्यवहारांसंबंधी नेहमी संशय आणि शंका व्यक्त करणाऱ्या राहुल गांधींनी याच शेअरबाजारातून गेल्या पाच महिन्यांमध्ये 46 लाख 50 हजार रुपयांचा नफा कमावला आहे. दोन दिवसांपूर्वी ही बाब स्पष्ट झाली आहे. राहुल गांधी यांनी शेअरबाजारात केलेल्या गुंतवणुकीचे एकंदर मूल्य सध्या 4 कोटी 80 लाख आहे. पाच महिन्यांपूर्वी ते 4 कोटी 33 लाख रुपये इतके होते.

आपल्याकडे कोणत्या कंपन्यांचे समभाग आहेत, याचा उल्लेख गांधी यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्या आधारावर आयएएनएस या संस्थेने त्यांच्याकडे असलेल्या समभागांचे आजचे एकंदर मूल्य किती याचा हिशोब केला असून आल्या ताज्या अहवालात तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या पाच महिन्यांमध्ये शेअरबाजारात जी उसळी आली आहे. त्याचे राहुल गांधीही मोठे लाभार्थी असल्याचे या संस्थेने अहवालात स्पष्ट केले आहे.

Advertisement

गांधींकडे कोणत्या कंपन्यांचे समभाग ?

गांधी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एशियन पेंटस्, बजाज फायनान्स, दीपक नैट्रेटस्, दिवीज लॅब्ज, जीएमएम फाऊडलर, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलीव्हर, आयटीसी, टीसीएस, टिटन, ट्यूब इन्व्हेस्टमेंटस्, एलटीआय इत्यादी अनेक कंपन्यांचे समभाग आहेत. त्यांच्याकडे एकंदर 24 मोठ्या कंपन्यांचे समभाग आहेत. या कंपन्यांपैकी केवळ चार कंपन्यांचे समभाग सध्या मंदीत आहेत. इतर सर्व कंपन्यांचे समभाग सध्या तेजीत आहेत. त्यामुळे एकंदर ते फायद्यात आहेत. याशिवाय गांधी यांच्याजवळ व्हेर्टोज अॅडव्हारटायझिंग लिमिटेड आणि व्हिनाईल केमिकल्स अशा छोट्या कंपन्यांचेही समभाग आहेत.

Advertisement
Tags :

.