महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी

06:33 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष भर्तृहरी महताब यांना पत्र लिहून राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील, अशी माहिती दिल्याचे वेणूगोपाल यांनी सांगितले.

Advertisement

राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेले गांधी घराण्यातील तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी हे पद भूषविले आहे. दरम्यान, 9 जून रोजी झालेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी, यासंदर्भातील ठराव पारीत करण्यात आला होता. मात्र, मला यासंदर्भत विचार करण्यासाठी वेळ द्या, असे राहुल गांधी म्हणाले होते.

दरम्यान, 2014 आणि 2019 च्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एकूण 99 जागांवर विजय मिळविला आहे. 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसला अनुक्रमे 44 आणि 52 जागांवर यश मिळाले होते. या निवडणुकांमध्ये भाजपानंतर काँग्रेस हा दुसरा मोठा पक्ष ठरला होता. मात्र, अपुऱ्या संख्याबळामुळे काँग्रेसला विरोध पक्षनेते पदावर दावा करता आला नव्हता.

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी आज खासदारकीची शपथ घेतली होती. यावेळी त्यांनी संविधानाची प्रत हातात पकडली होती. तसेच शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद जय संविधान’, अशी घोषणादेखील त्यांनी दिली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article