कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शीख दंगलीतील चुकांची राहुल गांधींकडून कबुली

06:03 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेतील संवादाचा व्हिडिओ व्हायरल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 1984 च्या शीखविरोधी दंगलीत काँग्रेस पक्षाच्या चुका कबूल केल्या आहेत. दंगली घडल्या तेव्हा आपण उपस्थित नव्हतो, मात्र काँग्रेस पक्षाने भूतकाळात केलेल्या सर्व चुकांची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अॅड पब्लिक अफेयर्स इथे झालेल्या प्रश्नोत्तर सत्रादरम्यान त्यांनी एका शीख व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर देताना शीख दंगलीबाबत भाष्य केले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान लोकांशी बोलत आहेत. संवादादरम्यान, एका शीख विद्यार्थ्याने राहुल गांधींना 1984 च्या दंगली आणि शिखांच्या समस्यांशी संबंधित काही प्रश्न विचारले. तसेच सदर शीख व्यक्तीने राहुल गांधींशी भाजपाच्या विधानावरून चर्चा केली. भाजपाच्या नेतृत्त्वात भारत कसा असेल आणि भाजपाच्या काळात शिखांना कडा घालण्याची किंवा पगडी घालण्याची परवानगी असेल का, याबाबतही चर्चा झाली. ‘भाजपा कसा असेल याबाबत तुम्ही शीख लोकांमध्ये भीती निर्माण करता. तुम्ही राजकारण कसे निर्भय असावे याबाबत बोललात. आम्हाला फक्त कडा घालायचा नाही. आम्हाला फक्त पगडी बांधायची नाही, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे, जे भूतकाळात म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या काळात नव्हते’, असे या शीख व्यक्तीने म्हटले आहे.

1984 च्या दंगलीतील आरोपी सज्जन कुमार सारख्या लोकांना संरक्षण देत असलेल्या शीखांच्या आवाजाकडे काँग्रेस दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी यांनी ‘मी जबाबदारी घेतो, 1980 च्या दशकात जे घडले ते चुकीचे होते,’ असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसवर दंगलीच्या आरोपींना संरक्षण देण्याचा आणि शिखांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचा आरोपही आहे. या संपूर्ण घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article