कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राहूल चहरचे 51 धावांत 8 बळी

06:22 AM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सरे संघात पदार्पणातील सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज राहुल चहरने हॅम्पशायर संघाचे 51 धावांत 8 गडी बाद केले. सरे संघातील गेल्या 166 वर्षांचा विक्रम चहरने मोडला आहे.

Advertisement

इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत चहरने सरे संघाबरोबर करार केला होता. या स्पर्धेतील पदार्पणातील सामन्यात राहुल चहरने भेदक गोलंदाजी केली. त्याने आपल्या 24 षटकात 51 धावांच्या मोबदल्यात 8 गडी बाद केले. चहरने या सामन्यात 118 धावांत 10 गडी बाद केल्याने सरेने हॅम्पशायरचा 20 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे. सरे संघाकडून 1889 मध्ये या स्पर्धेत विलियन मुडेलीने 61 धावांत 7 गडी बाद करण्याचा विक्रम राहुल चहरने मोडीत काढला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article