कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘रहेगा सब से उपर हमारा तिरंगा, हम है टीम इंडिया’

06:58 AM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगज्जेतेपद मिळविल्यानंतर भारतीय महिला संघाने प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफसह खेळपट्टीभोवती जमून गायले संघ गीत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी मुंबई

Advertisement

संघाची गाणी हा ऑस्ट्रेलियन पुऊष क्रिकेट संघाच्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि अॅशेस असो किंवा विश्वचषक, कोणत्याही मोठ्या विजयानंतर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग आणि स्टीव्हन स्मिथ यांनी नेहमीच गीत गाण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये कधीही अशी ‘टीम अँथम’ नव्हती आणि जगभरातील स्टेडियमवर नेहमी बझुका संगीत प्रणालींमधून भारतासाठी ‘चक दे इंडिया’ वा ‘सुनो गौर से दुनिया वालो’ अशी गीते वाजलेली आहेत. पण जवळजवळ दोन दशकांनंतर आणि लाखो वेळा वाजवल्यानंतर ही गीते एकसुरी वाटू लागली आहेत. म्हणून जेव्हा उत्साही जेमिमा रॉड्रिग्स आणि विश्वचषक विजेता संघ प्रशिक्षक आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांसह खेळपट्टीभोवती एकत्र जमून विजयाचे गीत गायले गेले तेव्हा ते एकदम ताजेतवाने वाटले.

‘रहेगा सब से उपर, हमारा तिरंगा, हम है टीम इंडिया, हम है टीम इंडिया’ हा जयघोष विजयाच्या रात्री खोलवर मनात गुंजला आणि संघाने मन मोकळे करून ते गायले. खेळपट्टीवर घालवलेल्या सहा तासांत संघ एका लयीत वावरला होता  आणि त्यामुळे गीत गाताना आपण सुरात आहेत की नाही याची कोणालाही पर्वा नव्हती. दूरवरूनही हे गाणे ऐकू आले आणि मुख्य प्रशिक्षक आणि मुंबईचे दिग्गज माजी खेळाडू अमोल मुजुमदार यांचा आवाज हे गाणे गाणाऱ्या प्रमुख लोकांमध्ये होता. ‘साथ में चलेंगे, साथ में उठेंगे, हम है टीम इंडिया, साथ में जीतेंग’ हे गाणे त्यांनी पहिला जागतिक चषक जिंकल्यानंतर मोठ्याने गायले.

भारतीय संघाने चांगली कामगिरी केल्यावर प्रत्येक वेळी जल्लोषात सहभागी होणारे त्यांचे उत्साही चाहते निघून गेल्यानंतर विजयी संघ संघगीत गाण्यासाठी उभा राहिला हे गीत कदाचित यापूर्वी कधीही ऐकले गेलेले नाही. उपकर्णधार स्मृती मानधना, जिने विश्वचषकात भारतीय संघातर्फे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला (434 धावा), तिने तिच्या सहकाऱ्यांसह आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्यासह मध्यभागी जाताना चषक दोन्ही हातात धरला. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध नाबाद 127 धावांची खेळी करून महिला क्रिकेट इतिहासात आणखी एक महत्त्वाचा क्षण जोडणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सलाही प्रेक्षकांची भरपूर पसंती लाभली. यावेळी तिचे कुटुंबीयही उपलब्ध होते.

भारताची पॉकेट डायनामाइट असलेल्या बांद्रा येथील या खेळाडूच्या नावे ‘जेमी, जेमी’, असा जयघोष प्रेक्षकांकडून सतत ऐकू आला. अलीकडच्या वर्षांत डी. वाय. पाटील स्टेडियमला हा जणू  तिचा घरचा स्टेडियम बनला असून या स्टेडियमवर गेल्या काही वर्षांत भारताचे अनेक सामने आयोजित केले गेले आहेत. कुटुंब आणि मित्रगण सोबत असताना कामगिरीवर विचार करण्यासाठी खेळाडूंकडे एकही क्षण नव्हता, असे असले, तरी भारतीय खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना ते या स्थळी असेपर्यंत मिठी मारून आणि त्यांचे सांत्वन करून त्यांच्याशी संवाद साधण्याचे सौजन्य दाखविले. मॅरिझान कॅपचे डोळे ओलावल्याचे स्पष्टपणे दिसत होते. जेमिमा आणि राधा यादव यांनी तिला मिठी मारली, तर स्पर्धेतील दोन सर्वोत्तम फलंदाज मानधना आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड (विक्रमी 571 धावा) यांनी त्यांचे पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी बराच वेळ गप्पा मारल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article