For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रहाणेला पुन्हा मैदानात बोलावले

06:20 AM Feb 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
रहाणेला पुन्हा मैदानात बोलावले
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

2024 च्या रणजी हंगामातील येथे सुरू असलेल्या मुंबई आणि आसाम यांच्यातील प्राथमिक साखळी फेरीतील अंतिम सामन्यावेळी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने मैदानात क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने त्याला पंचांनी बाद ठरविले. पण त्यानंतर आसामने या प्रकाराविरुद्धचे अपील मागे घेतल्याने पुन्हा त्याला मैदानात खेळण्यासाठी बोलावले. क्रिकेट क्षेत्रातील अशी घटना क्वचितच पहावयास मिळते.

मुंबई आणि आसाम यांच्यातील या सामन्यात शुक्रवारी चहापानापूर्वीच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली. आसामचा डाव 84 धावात मुंबईने गुंडाळल्यानंतर मुंबईने चहापानावेळी 4 बाद 102 धावा जमविल्या होत्या. रहाणे 18 धावांवर खेळत होता. आसाम संघात रणजी पदार्पण करणाऱ्या जोहरीच्या गोलंदाजीवर रहाणेने चेंडू मिडॉनच्या दिशेने टोलवून एकेरी धाव घेतली. दरम्यान धाव घेत असताना रहाणे आणि त्याचा साथिदार शिवम दुबे यांच्यात योग्य समन्वय राहिला नाही. आसामचा कर्णधार दासने आपल्या अचूक फेकीवर रहाणेला धावचीत केले. यानंतर आसामच्या खेळाडूंनी तातडीने मैदानावरील पंचाकडे क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याची तक्रार केली. पण त्यानंतर चहापानासाठी दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्ये परतले. या कालावधीत आसामच्या खेळाडूंनी आपली तक्रार मागे घेतल्याने आसामने रहाणेला पुन्हा मैदानात खेळण्याचे आवाहन केले. रणजी स्पर्धेमध्ये आतापर्यंत या वर्षीच्या हंगामात ब गटातून मुंबईने 30 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांनी आतापर्यंत 4 सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राखला असून एक सामना गमविला आहे. या कामगिरीमुळे मुंबई संघाने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

Advertisement

Advertisement

.