कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विघ्नेशच्या जागी रघु शर्मा

06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू विघ्नेश पुत्तूर याला दुखापत झाल्याने तो या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी फिरकी गोलंदाज रघु शर्माला बदली खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स संघातील केरळचा डावखुरा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुत्तूर याला स्नायु दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही. मुंबई इंडियन्सच्या फ्रांचायझीनी 31 वर्षीय रघु शर्माची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. रघुशर्मा पंजाब आणि पुडुचेरी संघाकडून आतापर्यंत 11 प्रथमश्रेणी सामने खेळले असून त्याने 57 बळी मिळविले आहेत. विघ्नेश पुत्तूरने 2025 च्या आयपीएल क्रिकेट हंगामात प्रथमच आपला सहभाग दर्शविला होता. त्याने या स्पर्धेत सहा गडी बाद केले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article