कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राफेल, जॅग्वार, मिराजने दाखवली ताकद

06:58 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस-वेवर लढाऊ विमानांचे ‘टच अँड गो’ : नाईट लँडिंगचा प्रयोगही यशस्वी

Advertisement

वृत्तसंस्था/ शाहजहानपूर

Advertisement

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती असतानाच सुरक्षा दलाने आपला सराव कायम ठेवला आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथील गंगा एक्स्प्रेस-वेवर शुक्रवारी भारतीय हवाई दलाने आपली ताकद दाखवली. वादळातही 3.5 किमी लांबीच्या धावपट्टीवर जॅग्वार, मिराज सारख्या 15 लढाऊ विमानांनी ‘टच अँड गो’ केले. सर्वात पहिल्यांदा सी-130जे सुपर हरक्यूलस विमानाने एक्स्प्रेस-वेवर ‘टच अँड गो’ केले. यानंतर, जॅग्वार, मिग आणि राफेल विमानांनी आकाशात एकत्र थरारक प्रात्यक्षिके दाखवत आपली चुणुक दाखवून दिली.

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी दुपारी सुमारे दोन तास सराव केला. या सरावावेळी एक्स्प्रेस-वेवर फक्त एएन-32 लढाऊ विमान उतरवण्यात आले. त्याला पुढे जायचे होते, पण वाऱ्याचा वेग इतका वेगवान होता की ते पुढे जाऊ शकले नाही. यानंतर पायलटने विमान 180 अंश कोनात फिरवत ते वाऱ्याच्या दिशेने वळवले. सुरुवातीला सी-130जे सुपर हरक्यूलस विमानाने एक्स्प्रेस-वेवर स्पर्श केल्यानंतर आजुबाजुला उपस्थित स्थानिक लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केल्याचे दिसून आले. तसेच लोकांनी अभिवादन करत ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर अन्य लढाऊ विमानांनी आकाशात स्टंट केले.

मिराजने एक्स्प्रेस-वेवर ‘टच अँड गो’ करतानाच अवकाशात विविध प्रकारे सराव सुरू ठेवला होता. सायंकाळपर्यंत 16 लढाऊ विमानांनी गंगा एक्स्प्रेस-वेवर ‘टच अँड गो’ केले होते. त्यानंतर रात्री जवळपास तीन तास नाईट लँडिंग शो अंतर्गत विविध प्रयोग करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता सुरू झालेल्या ह्या चाचण्या रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होत्या.

आजही होणार प्रात्यक्षिके

हवाई दलाचा सुरू झालेला हा सराव शनिवारीही सुरू राहणार आहे. यादरम्यान लढाऊ विमाने हवाई शो देखील सादर करतील. तथापि, शनिवारी पुन्हा रात्रीची प्रात्यक्षिके पुन्हा होणार नाहीत. शुक्रवारी झालेला सराव प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद स्थानिक लोकांनी मनमुरादपणे लुटला. महामार्गालगतच्या काही भागात शेती असून तेथील लोक हा सराव मोबाईल कॅमेराबद्ध करताना दिसून आले.

महामार्गावर हवाई धावपट्टी

गंगा एक्स्प्रेस-वे हा उत्तर प्रदेशातील हवाईपट्टी असलेला महामार्ग आहे. रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची क्षमता असलेला हा देशातील पहिला एक्स्प्रेस-वे आहे. गंगा एक्स्प्रेस-वे 36,230 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. मेरठ ते प्रयागराजपर्यंत बांधण्यात येणारा हा 594 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. या मार्गावर यापूर्वीही विमानांच्या विविध चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत.

हवाई दलासाठी विशेष रचना

हवाई दलाच्या गरजा लक्षात घेऊन महामार्गावरील धावपट्टीची रचना करण्यात आली आहे. हे क्षेत्र उच्च क्षमतेचे दिवे, स्वयंचलित वाहतूक नियंत्रण प्रणाली आणि 250 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हे क्षेत्र ताबडतोब धावपट्टीत बदलू शकते. येथे एक रुग्णालयही बांधण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article