राधिका आपटेला कन्यारत्न
अभिनेत्री राधिका आपटे विवाहाच्या 12 वर्षांनी आई झाली असून तिच्या आनंदाला उधाण आले आहे. राधिकाने मुलीला जन्म दिल्याच्या एक आठवड्यानंतर ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राधिकाची मैत्रिण सारा अफजलने अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अभिनंदन केले आहे.
राधिका आपटने मुलीसोबतचे एक छायाचित्र शेअर केले आहे. राधिकाच्या या छायाचित्रावर चाहते कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत. राधिका आपटेने बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्वत:च्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यापूर्वी तिने यासंबंधी कुठलीही वाच्यता करणे टाळले होते.
राधिका आपटे ही बॉलिवूड तसेच जागतिक स्तरावरील अत्यंत गुणवान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मुलगी जन्माला आल्याने राधिका आता काही काळ बॉलिवूडपासून दूर राहणार असल्याचे मानले जात आहे. परंतु पुढील काळात ती अनेक दमदार चित्रपट तसेच वेबसीरिजमध्ये दिसून येऊ शकते.