For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अज्ञात वाहनाच्या धडकेत घोटवडे येथील एकाच मृत्यू तर एक गंभीर

06:27 PM Feb 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
अज्ञात वाहनाच्या धडकेत घोटवडे येथील एकाच मृत्यू तर एक गंभीर
Radhanagari Ghotwade
Advertisement

राधानगरी /प्रतिनिधी

निपाणी - देवगड या राज्य मार्गावर राधानगरी पोलीस ठाण्याजवळ अज्ञात टेम्पोने दुचाकीला पाठी मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बंडोपंत आनंदराव पाटील(वय वर्ष 48) हे जागीच ठार झाले आहेत, तर त्यांचे सख्खेभाऊ विश्वास आनंदा पाटील हे गंभीर जखमी झाले जखमीवर राधानगरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले आहे.या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Advertisement

या बाबत अधिक माहिती अशी की घोटवडे येथील बंडोपंत पाटील व विश्वास पाटील हे दोघे सख्खे भाऊ तहसील कार्यालयात कामानिमित्त आले होते. काम उरकून दुपारी गावी जात असताना पोलीस ठाण्यापासून पासून दोनशे ते तीनशे मीटरवर आल्यानंतर अज्ञात टेम्पोने मागून जोराची धडक दिली. यामध्ये बंडोपंत पाटील हे जागीच ठार झाले आहे. त्यानंतर टेम्पो चालक टेम्पोसह पसार झाला. टेम्पोच्या शोधासाठी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज राधानगरी पोलीसाकडून तपासले जात आहे, अधिक तपास राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे, अरविंद पाटील हे करत आहेत

Advertisement
Advertisement
Tags :

.