For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राधानगरी धरणात 63 टक्के पाणीसाठा शिल्लक! पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

06:50 PM Mar 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
राधानगरी धरणात 63 टक्के पाणीसाठा शिल्लक  पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन
Radhanagari

राधानगरी / वार्ताहर

राधानगरी तालुक्यात या वर्षी उन्हाच्या तीव्रता मोठ्याप्रमाणात जाणवत आहे , अद्यापही एकही वळीव पाऊस बरसलेला नाही.त्यामुळे उष्णतेचा पारा प्रचंड वाढला आहे ,त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची मागणी वाढते आहे.गतवर्षी पाऊसही कमी झाल्याने राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रातील अभयारण्यातील ओघळ बंद झालेत, त्यामुळे आगामी दोन महिन्यांत पाणी टंचाईचे सावट दिसू लागलेत आहे
उन्हाचा चटका जसजसा वाढत जाईल तसतशी पाण्याची मागणीही वाढत आहे, मार्च महिन्यातच राधानगरी धरणाचे पाणी निम्यावर आले आहे,पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने वापर करायला हवा. त्यातच मार्च ते मे या उन्हाळी हंगामात अनेक भागात तीव्र उष्ण लाटा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असुन,मागील मान्सून मधील कमी पर्जन्यमान आणि सध्या चढत असलेला उन्हाचा पारा यामुळे दुष्काळाच्या झळीही वाढत आहे. अशा विपरीत वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर ही दिसून येतो.

Advertisement

राधानगरी धरणात सध्या 63% पाणीसाठा शिल्लक आहे. शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याची अधिक मागणी होत आहे. त्यामुळे राधानगरी धरणातील पाणीसाठा दिवसागणिक घटू लागला आहे. उन्हाळ्यामध्ये सलग15 दिवस राधानगरी धरणातून मागणी नुसार300 ते 1000 क्युसेक पाणी भोगावती नदीपत्रात सोडले जाते.हे धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असून शेतीसह पिण्याचे पाणी सुद्धा याच धरणातून वापरले जाते. तालुक्यातील इतर धरणांमुळे आजवर पाणी टंचाई जाणवली नसली तरी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत असलेल्या तापमानामुळे पाणीसाठा कमी होऊ शकतो. त्यामुळे जपून पाणी वापरावे लागणार आहे.

राधानगरी तालुक्यात पावसाचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी झाली आहे. गतवर्षीप्रमाणे जर जून महिना कोरडा गेला तर पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरा व योग्य नियोजन करावे लागणार आहे. पाटबंधारे विभागाकडून पाणी जपून वापरा व योग्य नियोजन करा असे सांगण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.