राधानगरी धरणाचे अद्यापही दोन दरवाजे खुले! 4356 क्यूसेकने विसर्ग सुरू
पडळी, पिरळ मार्गावरील वाहतूक सुरू
राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते शुक्रवारी पहाटे एक असे सहा दरवाजे खुले होते. शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने दोन दरवाजे बंद झाले शनिवारी सायंकाळी 7 वाजता धरणाचे क्रमांक 4 व 5 क्रमांकाचे दरवाजे बंद झाले असून नदीकाठच्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणाचे 2स्वयंचलित दरवाजे सुरू असून या दोन दरवाजातून 2856 क्युसेक तर बीओ टी पॉवर हाऊसमधून 1500 असा एकूण 4356 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.
सध्या धरणाची पाणी पातळी 346.86 फूट असून 8221.49 द. ल. घ. फू. इतका पाणीसाठा आहे.आज सकाळपर्यत 98मिमी पाऊस झाला असून १ जूनपासून आजअखेर एकूण पाऊस मि.मी. पाऊस झाला आहे. 3388 मी मी पाऊस नोंदला आहे,दरम्यान 2 स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने पडळी ,पिरळ सह इतर मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे