Prakash Aabitakar | राधानगरी मतदारसंघाने इतिहास घडवत मला पालकमंत्री केले : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
पनोरीमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकरच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन
पनोरी : विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, व्यासपीठावर मान्यवर,प्रतिनिधी सरवडेराधानगरी मतदारसंघात इतिहास घडवण्याची ताकद आहे.माझ्यासारख्या सामान्य माणसाला सलग तीन वेळा आमदार करून मला पालकमंत्री करण्याचे भाग्य या मतदारसंघातील जनतेनेच दिले. माझ्याकडे साखर कारखाने नाहीत, सोसायटी नाही, डेअरी नाही आणि माझे वडीलही आमदार-खासदार नाहीत तरीही जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पनोरी ता. राधानगरी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी तेआला.बोलत होते.
यावेळी विविध विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. पनोरी गावाला भरीव निधी दिल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा माजी सभापती गायत्रीदेवी सूर्यवंशी, शिवसेना महिला अध्यक्ष रेखा अजित देसाई आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात मंत्री आबिटकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पनोरी येथील महिलांनी दाखवलेल्या पाठिंब्याचा विशेष उल्लेख करुन पनोरीतील महिलांनी मला मोठी ताकद दिली.
या सर्व महिलांना मी मंत्रालयात नेऊन त्यांचा विशेष सत्कार करणार आहे. यावेळी आयुर्वेदिक उपचार करणारे डॉक्टर नारायण डवर व गावातील विविध क्षेत्रात निवड झालेल्या तरुणांचा सत्कार मंत्री अबिटकर यांच्या हस्ते करण्यात केला. तहसीलदार अनिता देशमुख, नंदकिशोर सूर्यवंशी, विठ्ठलराव खोराटे, सरपंच सुवर्णा परीट, सुभाष चौगले, सुभाष पाटील, शत्रुघन पाटील, अजित देसाई, विलास डवर, डी. पी. पाटील, डॉ. अजित शिंदे, प्राजक्ता पाटील, डॉ. सुशांत रेवडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.