कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आर. टी. सत्यनारायण मि.मंगळूर दसरा क्लासिक

12:11 PM Oct 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : म्हैसूर येथे दसरा क्रीडा महोत्सवानिमित्त दसरा मि. मंगळूर दसरा श्री क्लासिक  शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगिरीच्या आर. टी. सत्यनारायण याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. मंगळूर दसरा श्री क्लासिक हा किताब पटकाविला. तर बेळगावच्या व्ही. बी. किरणला उपविजेतेपदावरती समाधान मानावे लागले. उडपीच्या चिरागने उत्कृष्ट पोझरचा मान मिळविला. आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 7 वजनी गटात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत जवळपास 150 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

Advertisement

निकाल पुढील प्रमाणे...

Advertisement

मिस्टर मंगळूर दसरा क्लासिक किताबासाठी राजू मुचंडीकर, सूरज भंडारी, आकाश साळुंखे, प्रताप कालकुंद्रीकर, व्यंकटेश ताशिलदार, सूरज सिंग, आर. टी. सत्यनारायण, व्ही. बी. किरण यांच्यात लढत झाली. त्यामध्ये व्ही. बी. किरण व आर. टी. सत्यनारायण यांच्यात तुलनात्मक लढत झाली. यामध्ये आर. टी. सत्यनारायणने आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर किताब पटकाविला. तर व्ही. बी. किरणने उपविजेतेपद पटकाविले. उडपीच्या चिरागने उत्कृष्ट पोझर हा किताब मिळविला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article