आर. टी. सत्यनारायण मि.मंगळूर दसरा क्लासिक
बेळगाव : म्हैसूर येथे दसरा क्रीडा महोत्सवानिमित्त दसरा मि. मंगळूर दसरा श्री क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगिरीच्या आर. टी. सत्यनारायण याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. मंगळूर दसरा श्री क्लासिक हा किताब पटकाविला. तर बेळगावच्या व्ही. बी. किरणला उपविजेतेपदावरती समाधान मानावे लागले. उडपीच्या चिरागने उत्कृष्ट पोझरचा मान मिळविला. आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 7 वजनी गटात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत जवळपास 150 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल पुढील प्रमाणे...
- 55 किलो गट : 1) राजू मुचंडीकर-बेळगाव, 2) राजेश किलर-मंगळूर, 3)कृष्णप्रसाद-उडपी, 4)विजय जहागीरदार-धारवाड, 5) आकाश-मंगळूर
- 60 किलो गट : 1) सूरज भंडारी-बेळगाव, 2) सोमशेखर कारवी-उडपी, 3) प्रवीण पी. एम.-मंगळूर, 4)मंजुनाथ कलघटगी-बेळगाव, 5)चिराग-उडपी
- 65 किलो गट : 1) आकाश साळुंखे-बेळगाव, 2) किसन रै-मंगळूर, 3) मार्क-उडपी, 4) कौशिक-मंगळूर, 5) निरंजन पाटील-बेळगाव
- 70 किलो गट : 1) प्रताप कालकुंद्रीकर-बेळगाव, 2) रौनक गवस-बेळगाव, 3) धनंजय आचार्य-मंगळूर, 4)चंदनकुमार-धारवाड, 5)शशांक-मंगळूर
- 75 किलो गट : 1) व्यंकटेश ताशिलदार-बेळगाव, 2)विनायक पी.-शिमोगा, 3) सुनील भातकांडे-बेळगाव, 4)प्रितम पुजारी-मंगळूर, 5) नवीन-मंगळूर
- 80 किलो गट : 1)सूरज सिंग-उडपी, 2) स्टीव्हन-मंगळूर, 3) भावेश-उडपी, 4)राजेश-उडपी, 5) अभिलाश-उडपी
- 85 किलो गट : 1)आर. टी. सत्यनारायण-दावणगिरी, 2)गिरीश मॅगेरी-धारवाड, 3) दिग्विजय पाटील-बेळगाव, 4)विकास गौडा-मंगळूर, 5) वसंतकुमार-धारवाड
- 85 किलो वगील गट : 1)व्ही. बी. किरण-बेळगाव, 2) सचिन पुत्रन-मंगळूर, 3)श्रीवर्धन रेड्डी-होसपेट, 4) गितेश शेट्टी-मंगळूर, 5) चिराग आर.-उडपी यांनी विजेतेपद पटकाविले.
मिस्टर मंगळूर दसरा क्लासिक किताबासाठी राजू मुचंडीकर, सूरज भंडारी, आकाश साळुंखे, प्रताप कालकुंद्रीकर, व्यंकटेश ताशिलदार, सूरज सिंग, आर. टी. सत्यनारायण, व्ही. बी. किरण यांच्यात लढत झाली. त्यामध्ये व्ही. बी. किरण व आर. टी. सत्यनारायण यांच्यात तुलनात्मक लढत झाली. यामध्ये आर. टी. सत्यनारायणने आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर किताब पटकाविला. तर व्ही. बी. किरणने उपविजेतेपद पटकाविले. उडपीच्या चिरागने उत्कृष्ट पोझर हा किताब मिळविला.